चालतो मी वाट ती... जी...चालले नाही कुणी

Submitted by जयदीप. on 2 December, 2013 - 12:14

ओळखीचे आज येथे... वाटले नाही कुणी...
पाहुणे ते, पाहुणा मी... आपले नाही कुणी

किर्तने भरपूर झाली, खूपशी पारायणे
माणसाला देव येथे मानले नाही कुणी

वेळ फुलण्या लागणे हा...दोष ना आहे तुझा.....
हे निसर्गाचे नियम का.. पाळले नाही कुणी?

वाट माझी चालतो मी, एकटा असलो तरी
चालतो मी वाट ती... जी...चालले नाही कुणी

तू नको देऊस त्यांना..हात ही वाचावया...
माणसाचे भाग्य येथे.. वाचले नाही कुणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ... आवडली ... सुरे़ख ... "कालगंगा" खूपच gracefully हाताळलंय ...
सगळेच शेर आवडले .... मतला विशेष ...
त्यामानाने दुसरा शेर काहीसा निष्प्रभ वाटला ....

आवडली
तिसरा जरा कमी आवडला बाकी सगळेच छान वाटले

घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे आपले नाही कुणी
.......................असा अप्रतीम मिसरा असलेली बेफी़जींची एक अप्रतीम गझल आहे ....तीची पदोपदी आठवण आली आपण वाचली आहे काय ...त्यावरून प्रभावित होवुन ही लिहिली असावी असे जाणवले ..अर्थात तसे होणे वाईट /चुकीचे नाहीच ....मला सहज जे जाणवले ते बोलून दाखवले इतकेच गैरसमज नसावा Happy

शुभेच्छा

वैभवजी...

काल दिवसभर माझ्या डोक्यात 'मारली मी हाक तेंव्हा थांबले नाही कुणी' ही ओळ घुमत होती..
तत्सम मिसरा बेफिजींचा आहे/ त्यांनी उदाहरण म्हणून त्यांच्या गझल परिचय लेखात दिला आहे असं वाटत होतं. त्यावरूनच मला ही गझल सुचली !

बेफिजींची तुम्ही म्हणताय ती गझल मी वाचली होती..पण फार आधी.

काल मी मोबाईल न्यायला विसरलो होतो...मग वहीत लिहिली आणि घरी येऊन पोस्ट केली..

माझं काही चुकलं असेल तर माफ करा.

मतला सर्वात विशेष वाटला.

"वाट माझी चालतो मी, एकटा असलो तरी
चालतो मी वाट ती... जी...चालले नाही कुणी" >>> या शेरातील 'ती' वाट म्हणजे कोणती
हे स्पष्ट झाले असते तर शेर प्रभावी झाला असता असे वैम.

छानच

गजल छान आहे.
>> पाहुणे ते, पाहुणा मी... आपले नाही कुणी
हे आवडलं.
पण
>> घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे आपले नाही कुणी
अशी इतकी सिमिलॅरिटी असेल आणि तुम्ही ती आधी वाचली पण असेल तर कुठंतरी त्याचा उल्लेख दुसर्‍यांनी सांगण्याआधी व्हायला हवा होता. असो.

अशी इतकी सिमिलॅरिटी असेल आणि तुम्ही ती आधी वाचली पण असेल तर कुठंतरी त्याचा उल्लेख दुसर्‍यांनी सांगण्याआधी व्हायला हवा होता. +१

पारिजाता...

माझ्या लक्षात नाही आले.

वेळ फुलण्या लागणे हा...दोष ना आहे तुझा.....
हे निसर्गाचे नियम का.. पाळले नाही कुणी?<<< चांगला शेर आहे, खयालात नावीन्य!