साई देतील आधार रे!

Submitted by गणेश कुलकर्णी on 30 November, 2008 - 23:56

साई राम, साई शाम
साई नाम घ्या रे!
साई जिव, साई शिव
साई भाव म्हणा रे! ||१||

साई सुर, साई स्वर
साई नुर पहा रे!
साई गित, साई प्रित
साई साथ धरा रे! ||२||

साई मंदिर, साई मज्जीद
साई आरती, अजान रे!
साई इथे, साई तिथे
साई सर्वस्व मान रे! ||३|

साई सखा, साई पाठीराखा
साई दु:खा सुखा एक रे!
साई प्रेम, साई क्षेम
साई नाम उच्चार रे! ||४||

साई आकाश, साई धरणी
साई आई, साई बाबा रे!
साई प्रकाश, साई जीवनी
साई देतील आधार रे! ||५||
: गणेश कुलकर्णी (समीप)
९७६४७७३२५७

गुलमोहर: 

अगदी, फार फार आवष्यकता आहे आज साईंची. अर्थात ते आपल्यातच आहेत म्हणा , फक्त गरज आहे ती फक्त त्यांना ओळखण्याची आणि आचरणात आणण्याची.
गणेशजी या आधी पण तुम्ही टाकली होती होती का ही कविता मायबोलीवर. वाचल्यासारखी वाटतेय.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

ती कवीता "भेटतील साई" ही होती, ही थोडीशी वेगळी आहे.
ज्यानां सगळी कडे देव एकच दिसतो, त्यानां देवाच्या कवीता, गिते एकच दिसतात नाही का? Happy

साई करो आणी सर्व काही ठीक होवो. त्यांचाच आधार आहे आता. छान कविता!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

साई वाचकांना आधार देत नाहीत का हो?
आपण कधी कवितांच्या लयीच्या वगैरे(समीप ) गेला नाहीत काय?

ओम साई नाथाय नमः !