व्याकरणमुक्त कविता

Submitted by रसप on 30 November, 2013 - 04:29

रात्री बराच उशीरा झोपलो
तरी सकाळी लौकर उठलो

झोप झाली नव्हती
सुस्ती गेली नव्हती

नळाचं थंड पाणी तोंडावर मारलं
तोंडाच्या मोरीला ब्रशने खसाखसा घासलं

आंबलेली लाळ पांढऱ्या फेसासोबत बाहेर टाकली
चूळ भरून हातात घेतली पिण्याच्या पाण्याची बाटली

पण कंटाळा आला पाणी पिण्याचा
मनात विचार आला कविता लिहिण्याचा

तीच ही कविता, ठेवली आहे तुमच्यासमोर
आता टीका करतील सगळे समीक्षक मुजोर

इथे सगळ्यांची कविता सशक्त आहे
माझी कविता मात्र व्याकरणमुक्त आहे

तुम्हाला आवडत नसेल तर वाचू नका
नवीन लिहिणाऱ्याला हतोत्साहित करू नका

....रसप....
३० नोव्हेंबर २०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता जेव्हा मनात असते तेव्हा ती कवीची असते.
जेव्हा ती कागदावर उतरते आणि पब्लिक फोरम मध्ये जाते तेव्हा ती वैयक्तिक रहात नाही याचे भान प्रत्येक कवी-कवयित्रीने बाळगले पाहिजे. काय पब्लिश करावे आणि काय नाही हा कवी-कवयित्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य करून सुद्धा......

शरद सर,

खरंय तुमचं..
पण ही कविता व्याकरणमुक्त, चिंतनमुक्त, सारासारविचारमुक्त, पुनर्विचारमुक्त, सुधारणेचाविचारमुक्त ई. सर्व प्रकारे मुक्त आहे. Wink

Happy

Lol फारच मस्त. आणि ते टॅग्स तर जबरी.
>> भावनेने थबथबलेले लिखाण मनातील भावनांचा आरसा स्पॉन्टेनिअस ओव्हरफ्लो
Rofl

अंघोळ करण्यापूर्वीची, जी अंघोळ केल्यावर संपली, अशीही एक कविता आहे. ती कुठे तरी सांडली आहे. सापडली की डकवीन इथे.