अचाट मजेदार बातम्या

Submitted by उदयन.. on 29 November, 2013 - 04:36

निंबुडा यांचा पत्रकारितेची कमाल - मांजरीचे सूडनाट्य हा धागा वाचला..

या वरुन या धाग्याची संकल्पना घेतली

सकाळ, नवाकाळ इत्यादी बर्याच वृत्तपत्रांतुन आणि न्युज चॅनल्स च्या माध्यमातुन काही अचाट मजेदार बातम्या प्रसिध्द होतात......त्याला ना आगा असतो ना पिछा असतो..

यात इंडिया टिव्ही नावाचे न्युज चॅनल सर्वात पुढे आहेत......या चॅनल्स च्या हेडलाईन्स तर इतक्या अचाट असतात की हसुन हसुन पोट दुखायला लागते

काही उदा.

1.jpg2_1.jpg3.jpg4.jpg5.jpgइथे फक्त मजेदार आणि अचाट बातम्या द्याव्यात ... Biggrin

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी मल्लिका, आता चित्रांगदा

मोदी दाढी,मिशांशिवाय दिसतील आकर्षक-चित्रांगदा

बंगळूर - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे दाढी आणि मिशांशिवाय आणखी आकर्षक दिसतील, असे बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने म्हटले आहे. अभिनेत्री मल्लिका शेरावतनंतर मोदींची आणखी एका अभिनेत्रीने स्तुती केली आहे.

ह्या हिरोईनी अशक्य आहेत Rofl

उदय चोप्रा :- आय अ‍ॅम गोईंग टु टेक रिटायरमेन्ट फ्रॉम फिल्म इंडस्ट्री अ‍ॅन्ड कॉन्सन्ट्रेट द प्रॉडक्शन हाउस.....

अच्छा तु देखील दम देतेस असे लिहि ना सरळ उगाच मिशेल च्या खंद्यावर बंदुक का ठेवतेस

>> आपण ह्या विषयावर तुझं लग्न झालं की बोलुया हा उदय Happy

कॄपया विषयाला धरुन पोष्टी टाका.
वैय्यक्तिक बातम्यांसाठी वेगळा धागा काढा>>>> त्यासाठी गगो आहेच ना Wink

मयेकर निट पाहिल्यावर कळाले की तुम्ही बातमीची लिन्क दिलेली आहे,
आधी वाटले की कोणत्यातरी वादविवादावरची प्रतिक्रिया आहे की काय ? Wink

भारी आहे, खरोखर थोबडावतच परतवले..
पिल्लू मगर होते का? दात न आलेले?

बाकी या मांजरी शाणपत्तीत भारी असतात, कुत्र्यांना नडतात बिनधास्त, अन नडतात तेव्हा कुत्रेही घाबरतातच..

महाराष्ट्र टाईम्स मधे काही बातम्या देताना भांग पिऊन बातम्या देतात की काय?

मुखपृष्ठावर लेखकाचे नाव स्पष्टपणे दिसत असूनही ते दाऊदचे आत्मचरित्र आहे असे छातीठोकपणे ठोकून दिलेले आहे. Rofl

AMATA.jpg

चीनच्या हवाईदलात माकडांची भरती, विमानांच्या सुरक्षेची घेतात काळजी

चीनमध्ये अनेकदा विमानांना अपघात होतात किंवा काही अडथळे निर्माण होतात याचे कारण तिथल्या अभ्यासकांनी शोधल्यावर त्यांच्या लक्षात आले की, पक्षाच्या सततच्या वावरामुळे विमान वाहतुकीत अडथळे वाढले आहेत. ही माकडं झाडांवर किंवा इमारतींवर चढून अत्यंत सावधतेने पक्ष्यांची घरटे काढतात. त्यांच्यावर फार खर्च करावा लागत नाही, तसेच पक्षांनाही त्यांच्यापासून त्रास होत नाही, अशी माहिती हवाईदलाच्या विमानतळ संचालक वँग युजीन यांनी दिली आहे.

'चंद्राबाबूंनी अशुभवेळी शपथ घेतल्याने पडेना पाऊस'

हैदराबाद- चंद्राबाबू नायडू यांनी सूर्यास्ताच्या वेळी शपथ घेतली त्यामुळेच बियास नदीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तसेच इतर सर्व वाईट घटना त्यामुळेच घडल्या, असे विशाखापट्टणम येथील शारदा पीठाचे प्रमुख स्वरुपानंदेंद्र सरस्वती यांनी म्हटले आहे.

विशाखापट्टणम येथील साईबाबा मंदिरात अनुयायांच्या एका गटाला संबोधित करताना स्वरुपानंदेंद्र म्हणाले की, ‘आंध्र प्रदेशात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे, कारण नायडू यांनी ८ जून रोजी संध्याकाळी उशिरा शपथ घेतली.‘

‘नायडू यांनी शपथ घेतल्यानंतर पाऊस झाला नाही. नायडू यांच्या शपथविधीसाठी चुकीची वेळ निवडल्याचे हे परिणाम आहेत,‘ असा दावा स्वरुपानंदेंद्र यांनी केला.
दरम्यान, नायडू यांनी मात्र त्या दिवशी आवर्जून सात वाजून २७ मिनिटांची वेळ त्यांच्यासाठी शुभ आहे म्हणून निवडली होती. तसेच, संध्याकाळच्या वेळी जास्तीत जास्त लोकांना शपथविधी समारंभाला उपस्थित राहता यावे हाही उद्देश होता.

चीन:रमझानच्या उपवासावर बंदी
http://maharashtratimes.indiatimes.com/international/china-bans-ramzan-f...

जगभरातील मुस्लिम समाज पवित्र रमझानच्या महिन्यात उपवास धरतो. मात्र चीनी सरकारने आपला रंग दाखवत शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांना रोजे ठेवण्यास मनाई केली आहे. सरकारकडून या विभागातील शाळा आणि सरकारी कार्यालयात आदेश जारी करण्यात आले आहेत. त्या आदेशानुसार रमझानच्या महिन्यात उपवास ठेवण्यावर बंदी करण्यात आली आहे.

मुस्लिमांनी रोजे पाळल्याने आजूबाजूच्या लोकांना काय त्रास होणार आहे? आपल्या कामात व्यत्यय न आणता ते त्यांचे धार्मिक उपवास करत असतील तर काय बिघडते?

चीकू.........बरोबर आहे......पेटवा रे रान पेटवा आता... Happy

चीकू

त्याच काय आहे ना !

सर्व साधारण जग भरातील मुस्लिम समाजात , रमझान ( रमादान) महीना सर्वात पवित्र महीना म्हणुन मानला
जातो, त्या महीन्यात पवित्रता पाळली जाते, दान धर्म केला जातो, शीवी गाळ, भांडण टाळल जात .

पण ह्याच रमझान महीन्यात ईराक मधला हिंसाचार थांबलेला नाही. तिथेही मुसलमानच दुसर्या
मुसलमानांच्या जिवावर उठले आहेत, लहान मुले, वृद्ध, महीला कोणालाही सोडलेल नाही.

आणि ह्या सर्व खेळाला त्यांनी जिहादच म्हंटले आहे.

Pages