’कणखर’ होण्याचे सोडुन हे कसले खुळ करतो मी

Submitted by विजय दिनकर पाटील on 29 November, 2013 - 02:05

संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नोटांमध्ये उठून दिसण्यास्तव खुळखुळ करतो मी

फ़क्त हात दे बघ ह्याचेसुद्धा गोकुळ करतो मी

अंतरात बघण्याची हिंमत एकवटू ना शकलो
<<<

ह्या ओळी फार आवडल्या. मात्र गझल चर्चेस पात्र अशी वाटली. पुन्हा वाचत आहेच.

मात्र गझल चर्चेस पात्र अशी वाटली.

या गझलेला काही पार्श्वभूमी असावी असे वाटत आहे,

>>>

तूर्तास माझ्यातला 'बका' जागा झालाय असे समजावेत.

इथे आय डी निर्माण करण्यालाच जिथे पार्श्वभूमी असते तिथे त्या आय डी च्या धाग्यांना आणि पोष्टींना नसणार का? तुम्हाला कसे कळणार म्हणा, तुम्ही शेवटी एक ओरिजिनल आय डी!

छान

लाख असूदे ददात दुभत्याची संसारामध्ये
फ़क्त हात दे बघ ह्याचेसुद्धा गोकुळ करतो मी

अंतरात बघण्याची हिंमत एकवटू ना शकलो
टाळ विणा दिमतीला द्या राउळ राउळ करतो मी

हे दोन शेर फार आवडले. गझल आवडली.

लाख असूदे ददात दुभत्याची संसारामध्ये
फ़क्त हात दे बघ ह्याचेसुद्धा गोकुळ करतो मी

वा !! क्या बात !!!

वाह! विजय मस्तच आशय गझलेचा. खूपच भावली.

खास करून
>> गोड गोड बोलाल जरा तर विहंग व्हाल कदाचित
सडेतोड व्यक्तीचे केवळ वटवाघुळ करतो मी >> हा शेर फारच म्हणजे फारच आवडला.
गोड गोड कबूतरं (खोटेपणा) पावलोपावली सापडतात. खरेपणा आणि सडेतोडपणा सहसा दिसत नाहिच वटवाघुळासारखा... Happy

लाख असूदे ददात दुभत्याची संसारामध्ये
फ़क्त हात दे बघ ह्याचेसुद्धा गोकुळ करतो मी

व्वा.. सुरेखच !

सर्व विचार चांगले आहेत. तरी गज़ल आवडली नाही असे खेदपूर्वक म्हणावे लागते. Sad

त्याचे कारण एकच आहे. दीर्घ स्वराचे र्‍ह्स्व स्वरात रूपांतर! एखादी सूट आपण समजू शकतो; पण जवळ जवळ प्रत्येक ओळीत सूट घेणे हे मी समजू शकत नाही. खूळ, वटवाघूळ, राऊळ, सोडून, ठेऊन ....

सर्वच खयाल नेहमीप्रमाणे हटके सगळेच अशेर मस्तय्त
गोकुळ सर्वाधिक आवडला
राउळ राउळ करतो मी ..आधी वाचताना राउळ २ दा का ते चट्कन समजले नव्हते आता लक्षात आले ..खूप आवडला हाही शेर

वैयक्तिक संतापातून 'केलेली' ही गझल विशेष चांगली नाहीये ह्याची कल्पना आहे तरीही ज्या लोकांना शेर आवडले आणि ज्यांनी प्रामाणिकपणे नावडही(ज्यासाठी खरी हिंमत लागते) व्यक्त केली त्या सर्व गझलप्रेमी रसिकांचे मनःपूर्वक आभार.

शरदजी,

र्‍हस्वदीर्घाच्या मुद्याशी सहमत आहे. सुटी घेणे मलाही आवडत नाही. पण फॉर धिस गझल, एव्हरीथिंग इज सूट!

पुन्हा धन्यवाद!

वैयक्तिक संतापातून 'केलेली' ही गझल विशेष चांगली नाहीये ह्याची कल्पना आहे <<<

हे लिहिण्यासाठीही प्रामाणिकपणा लागतो जो दाखवलात त्यामुळे तुमच्याबद्दल मनात असलेली प्रतिमा अधिक उजळली. (लवकरच एक तावून सुलाखून काढलेली गझल पेश करा अशी फर्माईश)!

मात्र, 'मुशायरेबाज शेर' हा विषय अर्धाच राहिला, जो तुम्ही पुण्यात याल तेव्हा बोलूच.

शुभेच्छा!