दिव्यापयश

Submitted by निलेश_पंडित on 29 November, 2013 - 00:56

व्याख्याबद्ध यशात
गुंतत गेलो
"दिव्यापयश" ही कल्पना
कळलीच नाही
हृदयातील सुप्त धारिष्ट्याची
सूक्ष्म लाट
योग्य दिशेस
वळलीच नाही

मूकपणे पाहिले
दिनवाणे बळी
काळोख...भरदिवसा...
वेळी...अवेळी...
हृदयावर साचत गेली
धूळ निवळलीच नाही
"दिव्यापयश" ही कल्पना
कळलीच नाही

आता पळतो मीच दूर
राब राब राबून
माझ्या पासून
पांढरपेशा यश घेतो
रोख ठोक
कंबर कसून

क्षणभर परंतु एकांतात
अनावर अश्रू गळतात
बळी गेल्या अंधा-या दिशेस
भरले डोळे वळतात

- निलेश पंडित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.... एक वेगळाच आशय, विषय घेऊन आलेली कविता.
शेवटचं कडवं सर्वात प्रभावी.

फक्त "क्षणभर परि एकांतात" या ओळीतला
मुक्तछंदाला सूट न होणारा ’परि’ हा शब्द बदललात
तर अधिक बरे असे वाटले.
याऐवजी "परंतु क्षणभर एकांतात" हे सहज वाटेल असे वैम. कृगैन.

भिडे काका ... जोशी साहेब ... पूर्ण पणे मान्य ...
बदल केला देखील ... Happy
SRD ... सुप्रिया ... मनापासून आभार ...