फुलांचा इथे क्रूर व्यापार झाला

Submitted by जयदीप. on 28 November, 2013 - 22:42

कुणी थोर तो आज लाचार झाला
सुखाला सुखाचाच का भार झाला

किती घुसमटावेस आता सुखा तू..
तुला नेमका काय आजार झाला?

किनारा नकोसाच नावेस आता
तयाचा कुठे फार आधार झाला?

कळेना तुला कोण सामील आहे
नशीबा तुझा हेर का यार झाला

अश्या का उदासीन या वृक्ष- वेली
फुलांचा इथे क्रूर व्यापार झाला

नको धाक घालूस कलत्या वयाचा
मला जन्म इतकाच चिक्कार झाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृ गैरसमज नसावा, पण शेर टोकदार करायचा असल्यासः

नको धाक देऊस कलत्या वयाचा
मला जन्म माझाच चिक्कार झाला

या शेरात असा बदल करून पाहिला.

नको धाक देऊस कलत्या वयाचा
मला जन्म इतकाच चिक्कार झाला

सहज सुचले ते लिहिले, राग मानू नयेत.

(तसेच, धाक देऊस पेक्षा धाक घालूस हे अधिक सुलभ / प्रचलीत / ऐकलेले वगैरे वाटते)

नको धाक घालूस कलत्या वयाचा
मला जन्म इतकाच चिक्कार झाला

हा शेर अतिशय आवडला …

आणि बेफिजींनी सुचवलेल्या बदलानंतर तर तो अधिकच खुलला असं वाटलं …

भूषणः
इस्लाह आवडत नाही. मात्र तू सुचवलेला बदल एकदम पटला.

जयदीपजी:
आपण विचार केला असता तर हे साध्य होते.
लिहिताना फार घाई होतेय असे वाटते.

समीर

नको धाक घालूस कलत्या वयाचा
मला जन्म इतकाच चिक्कार झाला

वा ! एकदम निखरल रुपडं शेराच .

परत वाचली..

या दोन द्वीपदी खूप आवडल्या...

किती घुसमटावेस आता सुखा तू..
तुला नेमका काय आजार झाला?

अश्या का उदासीन या वृक्ष- वेली
फुलांचा इथे क्रूर व्यापार झाला

Happy