प्रार्थना एक सोपी

Submitted by सखा on 28 November, 2013 - 09:55

स्वर तुझे गीतास लाभूदेत आता
एक दास्ता जगास ऐकूदेत आता

तप्त निखारे न इथे सावली कणभर
दाह्ले पाय क्षणभर निवूदेत आता

कासावीस फुले कितीक केविलवाणी
हसरी गाणी मनात फुलूदेत आता

पहा एक मंदिर म्हण प्रार्थना सोपी
शांतता जन मनास लाभूदेत आता

भेटीले मज ध्यास आजन्म घेतला
भरूनी डोळे मजला पाहूदेत आता

-सत्यजित खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पुन्हा तेच म्हणायचे आहे जे काल परवा अशोक काकांच्या रचनेसाठी म्हणालो
..की लोक आजकाल रूढ अश्या ज्या अक्षरगणाच्या / मात्रावृत्ताच्या लयी असतात त्या न पाळता काही वेगळ्या नव्या प्रकारच्या लयी पाळत आहेत की कसे ???? मला कश्या माहीत नहीत अजून ...कुठेशिक शिकायला मिळतील ह्या लयी ??

तप्त निखारे न इथे सावली कणभर
दाह्ले पाय क्षणभर निवूदेत आता
हे कडवे आणि....

कासावीस फुले कितीक केविलवाणी

शांतता जन मनास लाभूदेत आता
या ओळी विशेष भावल्या.

*** मात्र, मात्रावृत्तात लिहीतानाही थोडी लय सांभाळलीत तर आणखी सुंदर वाटेल.

अर्थात, हे माझे मत. शेवटी निर्णय तुमचाच.