भद्र..

Submitted by के अंजली on 25 November, 2013 - 06:00

आपली ललाटरेषा सांभाळत
कैक वर्षे फिरतेच आहे..
ऊन सावलीचा सारा संसार
कित्येक वर्षे करतेच आहे..

तिचा प्रत्येक ऋतू कूस बदलतो
तशी तरूण तरुण होताना
पुन्हा वयस्कर होत आहे..

सारा भार साहते आहे
नकोश्या सार्‍या खुणांना
भारंभार पोटात घेत आहे
मूक होते आहे..

वाटतं...

हिने उठावं एकदा
झडझडून टाकावे सारे संग..

दूर फेकाटून द्याव्यात सार्‍या अभद्र गोष्टी
हलवून टाकावा सारा तळ..

यावा.. यावा सारा उद्वेग वर

उफाळू द्यावेत सारे निद्रिस्त ज्वालामुखी
तिच्या विशाल उदरातले..

होऊदेत सारा कहर..
भडकू दे वणवा सार्‍या अमंगलाचा..

जळूदेत यच्चयावत दैत्य...
मरुदेत...

राख राख होऊदेत....

अन् उरुदेत फक्त सारे...

भद्र..........!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

आपलीच ललाटरेषा सांभाळत
कैक वर्षे फिरतेच आहे..<<<

इतर कोणाची ललाटरेषा सांभाळत फिरण्याचे स्वातंत्र्य कुठे असते? Happy

(मुक्तछंदात टेक्निकल सुटी का घेतल्या जाव्यात? मुक्तछंद तर ठसठशीत पारदर्शकपणे अवतरू शकतोच की!)

ऊन सावलीचा सारा संसार<<< संसार या शब्दामागे 'सारा' हा शब्द का? हवा असलाच तर तो शब्द 'ऊन' या शब्दाच्याआधी हवा ना?

नकोश्या सार्‍या खुणांना
भारंभार पोटात घेत आहे<<< येथे 'भारंभार हा शब्द का? 'सारा भार'शी ध्वनीसाधर्म्य जपण्यासाठी? मुक्तछंदात(ही) लय असते ती हीच तर नाही?

झडझडून टाकावे सारे संग..<<<

झडझडून टाकावे सारे अंग की संग? जर संग असेल तर टाकावे'त' का नाही? हा तर मुक्तछंदच आहे ना?

निद्रीस्त <<< नक्की माहीत नाही, बहुधा 'निद्रिस्त असे असावे, 'निद्रीस्त' असल्यास क्षमस्व!

जळू देत यच्चयावत दैत्य.<<< जळू आणि देत हा एक शब्द असायला हवा ना? जळूदेत असा? हा तर मुक्तछंद आहे ना? की ह्याला 'टायपो'ही म्हणता येईल?

-'बेफिकीर'!

गप्पिष्ठ्ठ ... कित्ती ती जोडाक्षरे..!! Happy
आणि भारतीताई खूप आभार Happy

बेफि टायपो मिष्टेक करतेय दुरुस्त Happy पण तुमचा टेक्निकल 'सुटी' भारीये शब्द..!

खरंतर झडझडून टाकावे सारे अंग असाच हाताने लिहिताना वहीत शब्द लिहिला होता. पण टाईपताना तो संग झाला आणि मग विचार केला की त्यापेक्षा चांगला अर्थ यातून पोहोचतोय. म्ह्णून तो तसाच ठेवला.
भारंभारचं म्हणाल तर तशी परिस्थिती नाहीये का बेफि? लय मायंदाळ झाल्याती पापं.बिचारी घालतीये पोटात....

आणि हा तर मुक्तछंद आहे ना..? हे ध्रुवपद का गाताय हे माझ्या अल्पमतीला कळले नाही..

खूप धन्यवाद Happy