कविता मोडीत बसले

Submitted by सखा on 21 November, 2013 - 19:47

शब्द शब्द सुटा सुटा तोडीत बसले
काही शहाणे कविता मोडीत बसले

लग्ने युती अभद्र सत्तेसाठी नव्याने
लाखो भुजंग मुंगुस गोडीत बसले

खोदला पहाडात कुणी रस्ता एकाने
नामर्द कोपऱ्यात खडे फोडीत बसले

कुणी भविष्य देख उराशी कवटाळले
रडे लक्तरे पुराणी जोडीत बसले

जिगरबाज दर्या फिरून सारे आले
कलमबाज तर्र कागदी होडीत बसले

-सत्यजित खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्यजितराव,

जर तुम्ही स्वतःच्या ओळी गुणगुणू लागला तर लय लागेल. आणि लय लागली की मात्रांचे गणित सुटेल. Happy
किंवा दुसरी पद्धत आहेच - कविता मोडीत बसणे .... हे करावेच लागते. आपल्याला आवडत नसले तरी! आपण फक्त भावना समजतो; पण त्या भावना योग्य त्या फॉरमॅट मध्ये आहेत की नाहीत ते पहावेच लागते. आणि हे काम कवीने स्वतः केलेले जास्त चांगले. उदा. वरची गझल मी किंवा अन्य कुणीही 'दुरुस्त' करून देऊ शकेल; पण त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते ध्यानात येणार नाही.

शरदजी, नुकताच हा Video पाहण्यात आला. कवितेला अथवा गझलला गाण्याची सक्ती नसते.
http://www.youtube.com/watch?v=q2A5vGvGkBk
मात्र तुम्ही म्हणता तसे लयीत सहज लिहिता येणे हे सिद्धहस्त कवीचे कसब असते. प्रयत्न करत आहे. तुम्ही जरूर दुरुस्ती सुचवा. शेवटी विचारांची देवाण घेवाण झालीच पाहिजे. आपला, सत्यजित

सर्व शेरांचा एकच अर्थ लागतो आहे...असं मला वाटलं....लिहिलं छान आहे...पण अर्थ अजून सखोल हवा होता असं जाणवलं...

पु ले शु...

सत्यजित,

जिगरबाजचा विचार चांगला आहे. मात्र, आणखी थोडे काम वृत्ताच्या बाबतीत केलेत तर बरे...

घाई न करता विचार करून प्रकाशित करावेत असे वाटते.

पुलेशु.