" दीक्षा"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 November, 2013 - 12:47

दिली होतीस दीक्षा तू,कुठे मी घेतली बाबा
चिवर घालुन जुनी वस्त्रे जराशी फेकली बाबा

सदोदित रंगबाजी,पान,गुटखा आमची ओळख
जणू इंगळि डसावी नेहमी इश्कातली बाबा

अजूनी कर्मकांडे या त-हेने पाळतो आम्ही
कपाळे आमची निळसर थराने माखली बाबा

कळे झटक्यात एका की,असे जयभीमवाला मी
अजूनी आमची कॅटेगिरी ना सोडली बाबा

कुठे गेली तडफ तुझिया प्रजासत्ताक पक्षाची
कधी राकाँ कधी सेनेसमोरी वाकली बाबा

सुरामेरे यमज्जाचे तुझे संस्कार धुडकावुन
नवी उंचीच व्यसनाधीनतेची गाठली बाबा

तुझे पुतळे उभे केले दिली रस्त्यांस नावे पण
विचारांची तुझ्या तर वाट लावुन टाकली बाबा

जयंती अन महानिर्वाण म्हणजे झिंगणे आले
तुझ्यापेक्षा महत्वाची अम्हाला बाटली बाबा

--डॉ .कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजूनी कर्मकांडे या त-हेने पाळतो आम्ही
कपाळे आमची निळसर थराने माखली बाबा

कळे झटक्यात एका की,असे जयभीमवाला मी
अजूनी आमची कॅटेगिरी ना सोडली बाबा<<<

भेदक शेर!

तुझ्यापेक्षा महत्वाची अम्हाला बाटली बाबा<<<

प्रखर वास्तव मिसरा!

इंगळी - वृत्त

प्रभावी गझल.
आपल्या सांगण्यासारखे काही आहे हे कळले की मग झालं.
आपल्या हे लक्षात आलेले दिसते. अभिनंदन.

अजूनी कर्मकांडे या त-हेने पाळतो आम्ही
कपाळे आमची निळसर थराने माखली बाबा

कळे झटक्यात एका की,असे जयभीमवाला मी
अजूनी आमची कॅटेगिरी ना सोडली बाबा<<< व्वा ! >>>

खूप आवडली

चिवर म्हणजे ?

----------------

सदोदित रंगबाजी,पान,गुटखा आमची ओळख
जणू इंगळि डसावी नेहमी इश्कातली बाबा

अजूनी कर्मकांडे या त-हेने पाळतो आम्ही
कपाळे आमची निळसर थराने माखली बाबा

कळे झटक्यात एका की,असे जयभीमवाला मी
अजूनी आमची कॅटेगिरी ना सोडली बाबा

सुरामेरे यमज्जाचे तुझे संस्कार धुडकावुन
नवी उंचीच व्यसनाधीनतेची गाठली बाबा

तुझे पुतळे उभे केले दिली रस्त्यांस नावे पण
विचारांची तुझ्या तर वाट लावुन टाकली बाबा

जयंती अन महानिर्वाण म्हणजे झिंगणे आले
तुझ्यापेक्षा महत्वाची अम्हाला बाटली बाबा

हे सगळे जाम आवडले !

अजूनी कर्मकांडे या त-हेने पाळतो आम्ही
कपाळे आमची निळसर थराने माखली बाबा

मस्त…

सदोदित रंगबाजी,पान,गुटखा आमची ओळख
जणू इंगळि डसावी नेहमी इश्कातली बाबा

माझ्या मते वरच्या शेरात दोन्ही मिसर्यांचा परस्पर संबंध स्पष्ट वाटत नाही.
सानी सांगतो की जणू काही नेहमीच प्रेमाची लागण झालेली असते. आणि उला सांगतो की पान, गुटखा, रंगेलपणा इ. व्यसने आमची ओळख बनली आहेत. ही व्यसने येण्यामागे इश्क असेलच असे नाही. ( उ . गुटखा प्रेमात किंवा प्रेमभंगात rarely use होत असावा )
असे उलगडून सांगणे क्लिष्ट आणि त्रासक असते हे माहित आहे. तरीही वेळ मिळाल्यास तुमचा दृष्टीकोन सांगा अशी नम्र विनंती.

बाकी गझल मस्त आहे.

शुभेच्छा.

सदोदित रंगबाजी,पान,गुटखा आमची ओळख
जणू इंगळि डसावी नेहमी इश्कातली बाबा

ज्याला इश्काची इंगळी डसते, तो सदोदित रंगेल पणात वावरतो. गुटखा खाणे,पान-तंबाखूने तोंड रंगवणे आदि बाबी नेहमीच केल्या जातात.

नुसते पान खाणे ....वगैरे व्यसनी लोकांकडून नेहमीच होते,पण जो रंगेल असतो तो आपले रंगेलपण तिन्हीत्रिकाळ दाखवतो की जणू त्याला इश्काची इंगळीच डसली आहे.

तसा हा वर्णनात्मकच शेर आहे.

मला वाटते असाच अर्थ घ्यायचा आहे.

_/\_
_/\_
_/\_
_/\_
_/\_
_/\_
_/\_
_/\_

प्रत्येक शेरासाठी एक नमन !!!!!

बौद्ध भिक्षुच्या वस्त्राला चिवर असे म्हणतात.

बुद्ध्,धम्म आणि सन्घ या तिघांस शरणपर त्रिशरण पंच्शिल ही वंदना म्हटली जाते.त्यात " सुरा मेर यमज्ज पमाद ठाणा वेरमणी" अश्या ओळी आहेत...की ज्याचा अर्थ मी दारुल ब तत्सम व्यसनापासून दूर राहीन" असा होतो.

कैलास,

तुम्ही जी धडाडी दाखविली आहेत ती अमापच आहे. मी काही विचार लिहायचे की नाही असा विचार करीत होतो. मात्र, तुमची धडाडी पाहून लवकरच शब्दबद्ध करून माबोवर ठेवीनच.

धन्यवाद...

महाकाव्य ... जितकी जास्त वाचावी तितकी जास्त भिडत जाते ... विद्रोही कवितेला एक नवी दिशा देणारी उत्तुंग रचना .... ___/\___
एखाद्या विशिष्ट वर्गासाठी नव्हेच ही ... एकाच विशिष्ट वर्गासाठी म्हणता येईल फार तर ... चंगळवादी वर्गासाठी ....

जयंती अन महानिर्वाण म्हणजे झिंगणे आले
तुझ्यापेक्षा महत्वाची अम्हाला बाटली बाबा>>>>>>> ----/\---- सत्य परिस्थिती
आवडली Happy

तुझे पुतळे उभे केले दिली रस्त्यांस नावे पण
विचारांची तुझ्या तर वाट लावुन टाकली बाबा
जयंती अन महानिर्वाण म्हणजे झिंगणे आले
तुझ्यापेक्षा महत्वाची अम्हाला बाटली बाबा......क्या बात है डॉक....
लाजवाब.