एक तर्फी

Submitted by पशुपति on 12 November, 2013 - 09:47

एक तर्फी

मित्रांनो आणि मैत्रीणींनो,
ऐका सांगतो तुम्हास गोष्ट माझ्या प्रेमाची,
फसलेल्या एका घटनेची...............
आमच्या वाड्यासमोर होता एक वाडा,
खिडकी समोर होती एक खिडकी,
अन चौकटीत दिसायची एक चंद्रमुखी,
अंग केतकी, गाल गुलाबी,
केस काळे भोर अन ओठ डाळींबी,
अन, हो...! हनुवटीवर होते तीळ एक,
बागेत उमललेले एक फूल ते होते,.........................|

कलिजा खलास झाला............
खूप..........खूप प्रयत्न केला,
गळाला मासा गावेना,
दाद काही मिळेना,
सुत काही जमेना........................................||

पण एक दिवस,
हिय्या केला मनाचा,
शुक शुक करून बोलवायचा,......पण हाय,
पहिल्याच शुकेवर खिडकी झाली बंद,
क्षणभर माझ्या हृदयाचे ठोके..........ठोके पडले बंद,
काय सांगू ..................
किती एक रात्री काढल्या जागून,
अभ्यास काही होईना,
चैन काही पडेना,
अन मनीचा चंद्र मावळेना..................................||

पण एके दिवशी आला ....
योग आला भेटीचा,
परिक्षेत पास होण्याचा,
चौकटीतून आला ईशारा, वेळ दिली चारची,
सारस बागेत या म्हणाली, भेट होईल आपुली................||

काय वर्णावा आनंद मनीचा,
स्वर्गसुख आले जणू तिन्ही जगीचा,
ठेविली सतत नजर घड्याड्यावर,
पडले टोल..................अन,
धावली सायकल रस्त्यावर,
धडक देत शंभरावर,
लक्ष फक्त मत्स्य्भेदावर...................................||

पण नशीब होते माझे खडतर,
बागेत मला ती दिसली,
लांबून तिला मी ओळखली होती,
ती.....तीच होती.......ती तीच.......होती,
दुसऱ्याच कुणाच्या कवेत होती..................................||

Group content visibility: 
Public - accessible to all site users