फोटोग्राफी स्पर्धा..नोव्हेंबर.. "लोककला" निकाल

Submitted by उदयन.. on 11 November, 2013 - 06:43

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " नोव्हेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... " लोककला "

दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..

आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."लोककला" हा विषय घेउन आलो आहे.

लोककला हे भारताने जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. देशातिल ग्रामीण भागात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. देशात कुठेही जा, लोककला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात भेटते. भारतातिल लोककला इतकी समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे की आपल्या दैनंदिन जिवनातली मरगळ एक लोकगित ऐकल्या वर किंवा लोकनृत्य पार कुठल्या कुठे पळुन जाते. तुम्ही ही लोककला तुमच्या आयुष्यात कुठेना कुठे नक्कीच अनुभवली असेल आणि ते क्षण तुमच्या हृदयाच्या कप्प्या सोबतच कॅमेर्‍यातही बंदिस्त केले असतिल. तर तेच क्षण तुम्ही आमच्या समोर उलगडयाचे आहेत. या महिन्याच्या "लोककला" या थीमच्या माध्यमातुन..

माय्बोलीकर जगभरात आहेत म्हणुन जगातील सर्वच लोककला यांचा समावेश करण्यात येत आहे... थोडीफार माहीती त्याबद्दलची लिहिण्यात यावी .. कारण इतरांना माहीती सुध्दा मिळावी

प्रथम क्रमांकः नीधप : रावण तयार झाल्यावर
खुप छान फोटो. रंग छान आले आहेत. फोटो rule of thirds प्रमाणे आहे.

1 nidhap.jpgद्वितीय क्रमांकः नंदिनी: कल्लरेपायट्टू
फोटो मध्ये हाव-भाव, pose व वेग सुरेख टिपला आहे. फोटो थोडासा out of focus आहे पण ठिक आहे.

nandini 2.JPGतृतीय क्रमांकः प्रिया७ :
छान फोटो. वेग आणि poses छान आहेत.

3 priya.JPGऊत्तेजनार्थः फारुक सुतारः
छान pose. हा फोटो अगदी चेहर्‍यासमोरुन हवा होता.

faruk uttejanarth.jpg

आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************
.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेन्ट्रल पार्क न्युयॉर्क
इथे या ओवरीसदृश जागेमधे अनेक ग्रुप्स आपापली कला.........अर्थातच ....लोककला सादर करत होते.

हायला, मानुषी लगेच फोटो तय्यार हं! त्या बाया अशा कललेल्या कशाकाय उभ्या राहिल्यात देव जाणे! मात्र फोटो मस्त आहे.

विषय मस्तच आहे संयोजक. या विषयावर फोटो आहे का ते बघायला लागेल.

आला एक तरी विषय असा आला की जिथे काहीतरी फोटो टाकता येतील. Happy

मंगलोरला असताना तिथे नॅशनल युथ फेस्टिवल भरला होत्या, त्या उद्घाटन सोहळ्यातील काही प्रचि, मायबोलीवर पूर्वप्रकाशित.

सादर करणारे अर्थात लोककलाकार नाहीत. कॉलेज विद्यार्थीच आहेत.

कल्लरेपायट्टू (केरळी मार्शल आर्ट्स) : हे बघणे हा एक थरारक अनुभव असतो.

ओडिशी लोकनृत्य.

त्या बाया अशा कललेल्या कशाकाय उभ्या राहिल्यात देव जाणे!>>>>>>>> Biggrin
मामी......नाचता नाचता कलल्यात त्या "बाया"!
हो तो टॅप डान्सच................उदयन.

१)फेब्रुवारी महिना, कार्निव्हल चा , थंडीला घाबरवून पळवून लावायचा, त्यासाठी नटलेला हा छोटा मुलगा.
२) ह्याला लोककला म्हणता येईल का? चौकात मोक्याच्या जागी उभे राहून पुतळे झालेले कलाकार! DSCN1070.jpgIMG-20120510-00385.jpg

रिया, हो . खरा माणूस आहे. पापण्याही न हलवता उभा होता. मी अन माझी मैत्रीण बर्याच वेळ पहात होतो त्याच्याकडे आता हलेल, मग हलेल. शेवटी आम्ही जायला निघालो तर मस्त डोळा मारून बाय म्हणाला आम्हाला . Lol तो उभा आहे त्या डब्यामागे कॉइन्स टाकायला एक टोपी ही आहे. अशीच एक सुंदरी मार्बल होउन उभी असलेला फोटो पण आहे. शोधून टाकते. Happy

मस्त सुरुवात आहे

..........................

विषय "लोककला" आहे.....एवढे लक्षात राहु द्या

वाह!
इन्ना मानायला हवं अशा लोकांना
स्पेशली त्या मुलीला... अजिबात न बोलता , हलचाल न करता कशी राहु शकते ती Proud

इन्ना , खरतर ही माणसं पाहिली की उगाचचं कळमळतं Sad
फरक आहे , पण तरीही , मला ते कंपनीचे बॅनर घेउन किन्वा पॅम्प्लेट वाटणारी माणसं आठवतात.

अर्थात, हेमावैम.

इन्नाचा दुसरा फोटो पाऊन मुघलेआझम आठवला. Happy

आम्ही महाबलिपुरमला एक माणूस असाच गांधीचींच्या पोझमधे उभा असलेला पाहिला. फोटो काढायचा राहूनच गेला.

मला ,रंगपंचमी नंतर रंग घालवायला केलेले खटाटोप आठवतात ह्या लोकांना बघून . प्रत्येक वेळी हाss यवढा रंग धूवायचा म्हणजे Happy

हा यावर्षीच्या गणपतीचा ...फुगडी खेळतानाचा.
11.jpg

हा भजनाचा ... त्यावेळि तर लाईट गेलि होति. कदींलाच्या उजेडावर काढलेला आहे

.18.jpg

हे प्रचि स्पर्धेसाठी नाहित

तमाशा, एक अशी लोककला जी लावणिच्या रुपाने मराठी चित्रपटांच्या मानगुटिवर बसली आणि मग घराघरात पोहोचली. याच तमाशातील एक महत्वाच पण तितकच दुर्लक्षित राहिलेलं पात्र म्हणजे "नाच्या/मावशी". याच पात्राची एक झलक.

भांगडा

हे खालचे सगळे फोटो स्पर्धेसाठी नाहीत. खरं म्हणजे वरच्या टॅप डान्सिंगच्या फोटोसोबत एक लवासा सिटीतला राजस्थानी कालबेलिया डान्सरचा फोटो डकवणार आहे स्पर्धेसाठी. पण सापडत नाहीये. सापडला की डकवते.
आम्ही नेमके २००९ साली मायकेल जॅ़क्सन यांचं निधन झालं त्याच वेळी उसगावात होतो. आणि ज्या दिवशी न्युयॉर्कात सेन्ट्रल पार्कात मा. जॅक्सनला श्रद्धांजली होती त्याच दिवशी आम्ही तिथे होतो. म्हणून हे काही तिथले फोटो,


Pages