अता आलीस की थांबून जा

Submitted by जयदीप. on 7 November, 2013 - 08:37

अता आलीस की थांबून जा
गझल माझी नवी होऊन जा

तुझे दे चांदणे शब्दांस या
जरा रात्रीस कुरवाळून जा

सुगंधाने सजावी रोज ती
फुले गजर्‍यात या माळून जा

बुरे संपून जावे तिमिरही
मला प्रकाश तो देऊन जा

पुरे झाली जुनी भाषांतरे
नित नवा ग्रंथ तू मांडून जा

Group content visibility: 
Public - accessible to all site users