मी मला तुझ्यात पाहत होतो

Submitted by जयदीप. on 6 November, 2013 - 08:15

मी मला तुझ्यात पाहत होतो
मी जसा नवाच भासत होतो

तू नवे दिलेस अर्थ जगाचे
मी जिथे मलाच शोधत होतो

पालवी दिलीस आज उद्याची
मी मुक्या वनात संपत होतो

सावली दिलीस तूच जराशी
मी जुन्या उन्हात हिंडत होतो

तोडलेस तूच बांध मनाचे
मी मनात रोज साठत होतो..

Group content visibility: 
Public - accessible to all site users