स्पेशल बेसन लाडू

Submitted by दिनेश. on 6 November, 2013 - 02:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
वाटीच्या आणि लाडवाच्या आकारानुसार ८ ते १० लाडू होतील.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार प्रिति, सोनाली.
विजय, दूध घातले तरी आठवडाभर सहज टिकतील. आम्ही नेहमीच्या बेसन लाडवाच्या बेसनातही असे दूध घालतो.

हो साधना,
पिठीसाखर तोंडात लगेच विरघळते तशी बुरा विरघळत नाही. त्यामुळे हा लाडूही तोंडात लगेच लगदा होत नाही. चावून खावा लागतो.
मुंबईत मथुरेचा पेढा मिळतो तो आणि साधा पेढा मिळतो त्याच्या चवीत जो फरक असतो, तसाच फरक.

ओक्के.
डि-मार्टात मिळणा-या पिठी साखरेवर साखर्-बुरा लिहिलेले वाचलेय पण आतमध्ये पिठी साखरच होती. त्यामुळे पिठी साखरेलाच बुरा साखर म्हणतात असे मला वाटलेले.

घरी मोठ्या प्रमाणावर करायची असेल तर पक्का पाक, परातीत ओतून तो तांब्याने घोळत असत. भराभर घोळल्यावर परातभर कुरकुरीत बुरा साखर तयार होत असे. आमच्याकडे चिवड्यात पण हीच साखर घालत असत.

बेसनाचे लाडू खूप आवडतात पण साखरेची कचकच आणि रवाळ बेसन ला बिग नो नो. Sad
मला आपले मऊसूत बसके गोड बेसनाचे लाडूच आवडतात. सई करते ते. Happy (आता ती मला ओरडेल बसके लाडू म्हणाले म्हणून. Lol )

दिनेश, आभार. अजुन एक विचारायचं राहिलं, बेसन बारिक असेल तर चालेल का? की सोबत काही वापरावं? करुन बघतो.

मागे तुम्ही सांगीतलेली रोटी की टोकरी करुन बघितली. ५ केल्या, त्यात शेवटची जमली Happy

वा, सुंदर. गोड आवडत नाही जास्त पण काय दिसतायत लाडू. (नवऱ्यासाठी करेन ह्या पद्धतीने, नेहेमी बारीक बेसनाचे करते.)

मलाही तसे मऊच आवडतात. मस्त भाजलेले आणि साखर अगदी योग्यच प्रमाणात टाकलेले.

तोंडात टाकल्यावर मस्त विरघळ्त राहायला हवेत.

आमच्या ऑफिसात रवाळ मिळतात. तेही चांगले लागतात. पण बेसनाचे लाडु वाटत नाहीत रवाळपणामुळे..

यावर्षी मी केले नाहीत आणि जे घरी आले ते नुसते अर्धवट भाजलेल्या बेसनात घातलेल्या साखरेचे गोळे होते. त्यामुळे Sad Sad

विजय, मग त्यात थोडा रवा ( वेगळा भाजून ) मिसळावा लागेल.
हे लाडू मी इकडे ( अंगोलात ) केलेत. आमच्याघरी ते मऊसरच होतात. आईचे २/३ तास केवळ बेसन भाजण्यात जातात. जोपर्यंत शेजारच्या काकूंना बेसनाचा खमंग वास जाऊन त्या चौकशीला येत नाहीत, तोपर्यंत ते चांगले भाजले गेलेय असे आईला वाटत नाही.

मी पण डि-मार्टातून पिठी साखर आणली होती त्यावर साखर्-बुरा लिहिलेले होते. आणि आतमध्ये पिठी साखरच होती. मलापण पिठी साखरआणि बुरा साखर म्हणजे एकच वाटले होते.

फोटो छान आलाय, लाडूही चांगले झालेले दिसतायत. पण लाडू खाताना कुठल्याही स्वरुपाचे कष्ट पडायला नकोत असं वाटलं Happy घरात सगळ्यांना मवाळ लाडूच आवडतात त्यामुळे केले जाणार नाहीत. वर प्रतिसादात तसा स्पष्ट उल्लेख आलाच आहे Happy

(आता ती मला ओरडेल बसके लाडू म्हणाले म्हणून. हाहा )>>>>>>>>सई, आता तिलाच करायला सांग ग. Happy
veDyaa bahiNeechee veDee hi maayaa !>>>>>>>>>>>> खरं आहे. Lol

Pages