काही सुटे शेर ......

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 November, 2013 - 01:47

शाकारल्या मनाचे छप्पर उडून जाते
दररोज एक वादळ दारावरून जाते

==============================

डावीकडे, उजवीकडे ताटात नक्की मी कुठे
पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे ?

==============================

किती अस्वस्थशी होते स्वतःचे ऐकते तेव्हा
किती निर्धास्त असते मी मनाला मारते तेव्हा

==============================

रात्र रात्र जागतो गुंड वाटतो मला
चालते जिथे तिथे चंद्र गाठतो मला

==============================

स्वैपाघरात अर्धे अन उंब-यात जाते
आयुष्य कंठल्यावर सा-याजणींस कळते

==============================

जेव्हा त्याच्या अस्तित्वावर घेते संशय
तेव्हा तेव्हा 'तो' असल्याचा येतो प्रत्यय

==============================

नेमका कोणी मनाचा उंबरा ओलांडला
हिंडते माझ्या घरी मी वाट चुकल्यासारखी

==============================

पैलतीरावर तसे पोहचणे कठीण नाही
डळमळतो आहे आठवणींचा पूल जरासा

==============================

हे गुंतणे त्याच्यामधे इतके निरर्थक...
कमळात अडकावा जसा भुंगा अचानक !

==============================

आयुष्याने केले आहे निरीच्छ इतके
कशी पूर्तता करू तुझ्या माफक ईच्छांची

==============================

रस्त्यामधे दोन्हीकडे गर्दी व्यथांची वाढती
दु:खास या ओलांडण्या चढुया सुखाचा दादरा

++++++++++++++++++++++++++++++

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाकारल्या मनाचे छप्पर उडून जाते
दररोज एक वादळ दारावरून जाते<<< व्वा

==============================

डावीकडे, उजवीकडे ताटात नक्की मी कुठे
पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे ?<<< नावीन्यपूर्ण खयाल!!

==============================

किती अस्वस्थशी होते स्वतःचे ऐकते तेव्हा
किती निर्धास्त असते मी मनाला मारते तेव्हा<<< व्वा व्वा, दुसरी ओळ सुरेखच!

==============================

रात्र रात्र जागतो गुंड वाटतो मला
चालते जिथे तिथे चंद्र गाठतो मला<<< हम्म्म्म

==============================

जेव्हा त्याच्या अस्तित्वावर घेते संशय
तेव्हा तेव्हा 'तो' असल्याचा येतो प्रत्यय<<< वा वा

==============================

नेमका कोणी मनाचा उंबरा ओलांडला
हिंडते माझ्या घरी मी वाट चुकल्यासारखी<<< व्वा! पुन्हा दुसरी ओळ अप्रतिम!

==============================

जीवना संपव परीक्षा मेळ घालू उत्तराशी
जे मला अभिप्रेत आहे ते तुला अभिप्रेत नाही<<< अभिप्रेत मधील भि च्या मात्रा दोन होतात Happy

==============================

आयुष्याने केले आहे निरीच्छ इतके
कशी पूर्तता करू तुझ्या माफक ईच्छांची<<< सुंदर

==============================

रस्त्यामधे दोन्हीकडे गर्दी व्यथांची वाढती
दु:खास या ओलांडुनी चढुया सुखाचा दादरा<<< छान शेर!

<<<<जीवना संपव परीक्षा मेळ घालू उत्तराशी
जे मला अभिप्रेत आहे ते तुला अभिप्रेत नाही<<< अभिप्रेत मधील भि च्या मात्रा दोन होतात स्मित>>>>>>

ओ !! हा !!! Sad

धन्यवाद बेफिजी,
शेरच बदलला .

धन्स प्रिंसेस !

- सुप्रिया.

सर्वच छान ...............

नेमका कोणी मनाचा उंबरा ओलांडला
हिंडते माझ्या घरी मी वाट चुकल्यासारखी.................... हा मस्त

शाकारल्या मनाचे छप्पर उडून जाते
दररोज एक वादळ दारावरून जाते

जेव्हा त्याच्या अस्तित्वावर घेते संशय
तेव्हा तेव्हा 'तो' असल्याचा येतो प्रत्यय

शेर फार आवडले.

सुप्रियाजी छान आहेत शेर. खरेतर शेर वगेरे मी आधी फार वाचलेले नाहीत पण तुमचे लिखाण खूप मनापासून अगदी "दिलसे " आल्यासारखे वाटते .
मायबोली वर बाकी पण काही लोक खूप छान लिहितात .
इथे आल्यापासून गझल वाचायची तरी सवय लागली म्हणायची !

इथे आल्यापासून गझल वाचायची तरी सवय लागली म्हणायची >> अन्विता अनुमोदन.
मला तर आधी गझल ही फक्त उर्दूच असते असं वाटायचं. (बघा मी किती माठ :फिदी:)

>>
नेमका कोणी मनाचा उंबरा ओलांडला
हिंडते माझ्या घरी मी वाट चुकल्यासारखी
<<
वा! Happy

>>
किती अस्वस्थशी होते स्वतःचे ऐकते तेव्हा
किती निर्धास्त असते मी मनाला मारते तेव्हा
<<

हाही खयाल आवडला. Happy

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

बेफीजी, दक्षिणा विशेष.

जोशी साहेब आपल्यासाठीही ताईच ? Happy (लहान असेन हो कदाचित आपल्यापेक्षा मी )

धन्यवाद !

-सुप्रिया.