या बहराला काय नाव देऊ...

Submitted by जयदीप. on 5 November, 2013 - 21:49

या बहराला काय नाव देऊ...
आज मनाचा काय ठाव देऊ ?

आठवणींचे स्पर्श शोधतो मी...
लपुन नको तू आज घाव देऊ...

मालक तू माझ्या मनात आता
का मजला मी हा लिलाव देऊ?

तू जवळी माझ्या रहा नित अशी..
दुष्ट दुराव्याला न वाव देऊ...

जिंक अता माझे मुलूख सारे
आज जगाला हा ठराव देऊ!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके..

डन!