जगात दु:ख एवढे सुखात मी जगू कसा (तरही)

Submitted by इस्रो on 4 November, 2013 - 05:27

असे उदास चेहरे, बघून मी हसू कसा ?
जगात दु:ख एवढे, सुखात मी जगू कसा ?

घडू नये कुठे असे, अघोर लागले घडू
जगात देश हा अता, महान मी म्ह्णू कसा ?

खुणावतो मॄत्यू मला, कधी इथे कधी तिथे
अता अशा पुण्यात मी, निघोर वावरु कसा ?

इसम इमानदार ना, इथे कुणीच राहिला
लबाड बेरक्यांस मी, सरळ भला कळू कसा ?

जगायचे इथेच अन, मरायचे इथेच मज
उगाच मोजण्यात वय, हयात घालवू कसा?

-नाहिद नालबंद
[९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले सगळेच शेर नाहिदभाई
खुणावतो मॄत्यू मला, <<< वृत्त ? Happy >>खुणावते मरण मला<< असे करू शकता Happy

धन्यवाद

छान गजल!

>>खुणावते मरण मला<< असे करू शकता +१

<<<<घडू नये कुठे असे, अघोर लागले घडू
जगात देश हा अता, महान मी म्ह्णू कसा ?

खुणावतो मॄत्यू मला, कधी इथे कधी तिथे
अता अशा पुण्यात मी, निघोर वावरु कसा ?>>>> या दोन आवडल्या! :स्मितः

वा नाहिदजी ..छान गझल .
मतल्याचा उला मिसरा तरहीच्या ओळीला न्याय देणारा झाला आहे .

वैभवजींची सुचना योग्य वाटते ..त्यावर विचार व्हावा .

छान