अॅबोरशन नंतर....

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 November, 2013 - 05:17

ते लुकलुकणारे हृदय
सोनोग्राफीच्या पडद्यावर
हीच तुझी माझी
पहिली अन शेवटची भेट

त्यानंतर ,
प्रश्नांची मालिका
प्रचंड दडपण
मानसिक ताण ..
करावे न करावे
उठलेले वावटळ

आणि शेवटी
घेतलेला निर्णय
नाही ! नकोच !!

अॅडमिशन मग
डॉक्टरांनी उरकलेला
सोपस्कर
देहाचे यंत्र
ताब्यात देवून त्यांच्या
खरडून टाकला
नको असलेला अंकुर

एवढ अपराधी
आयुष्यात कधीही
वाटल नव्हत मला
तू मुलगा आहेस कि मुलगी
माहित नव्हत ! खरच !
ते कारण हि नव्हत
तुला त्यागण्याच
अनेक परिणाम टाळणारा
तो एक कटू निर्णय होता
असहायपणे घेतलेला
खरच सांगते
प्रथमच देहाची
देहातील कामोर्मीची
लाज वाटू लागली
त्याचा स्पर्श हि
नको वाटू लागला
तेव्हा पासून

उलटणारे महिने
कॅलेन्डेर वरील खुणा
तू नसूनही तुझी वाढ
मला सांगत होते
आणि माझ्या
रित्या ओटी पोटीत
मीच रोज मरत होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांतजी नेहमीच अश्या हलक्या फुलक्या पद्धतीने अतीशय संवेदनशील व प्रबोधन गरजेचे असलेल्या विषयानाच हात घालतात सुप्रियातै
कविता आवडली विक्रांतजी (हृद्य च्या जागी हृदय =hRuday असे टाईप करावेत )
@ दिनेश कविता ह्या जीवनविषयाबद्दल घेणेदेणेच नसेल कुणाच्या संवेदना वाचताच येत नसतील काय लिहिले त्याच्या अर्थातले काही कळतच नसेल विषय काय चाललाय तिथे माणसाने वेळप्रसंगानुसार काय बोलावे ह्याची अक्कल आपणास नसेल तर ठीक आहे पण असे नतद्रष्टासारखे हसत तरी नका जाऊ

दक्षिणा ,सुप्रिया,,वैभव .अनेक धन्यवाद ..
वैभव ,@ दिनेश बद्दल आपण योग्य ते लिहिलेच आहे .त्या बद्दल आभार .अश्या प्रतिक्रिये मुळे असंवेदनशिलतेचा प्रत्येय येतो..हा हि एक धडाच .