पापुद्रे

Submitted by जयदीप. on 3 November, 2013 - 13:42

पुढे गेल्यावर वळूनी बघणार्‍यांतला नाही
तसा मी हात पकडून सोडणार्‍यातला नाही

जरा सुटलेल्या पापद्र्यांतून नको डोकावू
मी जुन्यावरच नवा रंग देणार्‍यातला नाही

उगाचच नको गाळूस तुझे अमूल्य अश्रू असे
तसा मी सहजपणेच विरघळणार्‍यातला नाही

उसन्या श्रीमंतीचे ते आव नको आणू अता
तसा मी कधी स्वत:ला विकणार्‍यातला नाही

तू नको शोधूस दुसरे माझ्यासारखे कोणी
तसा मी कधीच मुबलकश्या काफियांतला नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users