विराट कोहली

Submitted by बेफ़िकीर on 31 October, 2013 - 05:43

"इट्स टू अर्ली"

"लूक अ‍ॅट द स्टॅट्स"

"आणि फिटनेसचे काय??"

या सर्व प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरूनही असे म्हणावेसे वाटत आहे की विराट कोहलीने फलंदाजीत प्रदर्शीत केलेले सातत्य आणि संघाच्या विजयास कारणीभूत होण्याची वारंवारता या निकषांनुसार तो भारताचा 'ऑल टाईम्स ग्रेट' फलंदाज बनत आहे. ही प्रक्रिया सध्या चालू आहे, त्याने फिटनेस राखून संघातील स्थान अजुन अनेक वर्षे अबाधित ठेवले तर ती प्रक्रिया पूर्ण होईल. सांख्यिकी माहितीनुसार तेंडुलकर वय वर्षे पंचवीस व विराट कोहली वय वर्षे पंचवीस ही तुलना केली तर विराटच्या धावांचे, सरासरीचे, शतकांचे, सातत्याचे व विजयास कारणीभूत ठरण्याचे टेबल अधिक दिमाखात झळकत आहे. याशिवाय तीन गुण प्रखरपणे दिसतात ते जिगरबाज खेळ, धावसंख्येचा पाठलाग करण्यातील सातत्य व भरवश्यास पात्र ठरणे! (एकप्रकारे हे सगळे एकाच गुणाचे तीन कोन आहेत असेही म्हणता येईल).

एक गंमत किंवा आवड म्हणून अ‍ॅनलाईझ करायचे ठरवले तर काही दिग्गजांच्या विशिष्ट गुणांचे मिश्रण त्याच्या व्यक्तिमत्वात आढळते.

जावेद मियाँदाद - जिगर
व्हिव्हियन रिचर्ड्स - धडाकेबाज फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघावर अ‍ॅबसोल्यूट दहशत
अ‍ॅटिट्यूड - गांगुली
सातत्य - अ‍ॅडम गिलख्रिस्ट

क्रिकेटमध्ये सहसा न शोभणारा शीघ्रकोपी स्वभावही बहुतेक त्याच्यात असावा असे दिसते.

पण एकुण कॅरॅक्टर म्हंटले तर आपल्यासारख्या कधीही कुठेही नांगी टाकणार्‍या संघाच्या स्पिरिटसाठी अत्यावश्यकच आहे. विशेषतः गांजा प्यायल्याप्रमाणे गोलंदाजी करणारे गोलंदाज संघात असताना असा फलंदाज असणे ही एक किमान गरज म्हणावी लागेल.

बाकी अजुन भारतीयांना, माध्यमांना, समालोचकांना वगैरे तेंडुलकरच्या निवृत्तीतच समाधी अवस्था लाभत आहे म्हणा!

आपल्या देशात आणखी एक घडते. जो उत्तम खेळतो तोच उत्तम कर्णधारही ठरेल असे गृहीतक ठेवून काहीजण वावरतात. प्रत्यक्षात ती जबाबदारी आल्यावर त्या खेळाडूचा मूळ खेळही प्रभावित होऊन बसतो. पुढेमागे विराटवर ही वेळ आणली जाऊ नये अशी इच्छा!

बहुधा आपण सगळे (आणखीन) एका (किंवा खर्‍याखुर्‍या) सार्वकालीन महान खेळाडूच्या मेकिंगचे साक्षीदार आहोत. Happy

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोहली जे काही mind-boggling सध्या करतोय त्याबद्दल शंकाच नाही फक्त त्याला कोणाशीही compare करायची गरज नसावी. Let him erect his own monuments . पहिल्या वाक्यानंतर लेख संपवायला हवा होता.

भारताचा 'ऑल टाईम्स ग्रेट'>>>> विराट चांगला खेळतोय यात वादच नाही पण हे जरा अतीच होतंय...दर वेळी लेबल्स लावायलाच हवीत का??

"इट्स टू अर्ली"

"लूक अ‍ॅट द स्टॅट्स"

"आणि फिटनेसचे काय??">>>>>

>>> एवढं सगळं कळतय तर पुढचा पसारा कशाला...

विराटबद्दल सहमत.
मात्र, <<बाकी अजुन भारतीयांना, माध्यमांना, समालोचकांना वगैरे तेंडुलकरच्या निवृत्तीतच समाधी अवस्था लाभत आहे म्हणा! >> हा बॉल 'वाईड' आहे, हें कळायला अंपायरच्या हाताकडेही पहाण्याची गरज नसावी ! Wink

विराट कोहली....

प्रचंड गुणवत्ता ठस्सुन भरलेली ...लहान पणीच यशाची चव चाखायला मिळालेला खेळाडु... अंडर १९ वर्ल्डकप जिंकलेल्या संघाचा तो कर्णधार होता ...
जेव्हा मी नागपुरात वर्ल्ड्कप चा सामना बघायला गेलेलो तेव्हा येताना आमच्या विमानात सगळी भारतीय टीम होती.. तेव्हाचा विराट अत्यंत उर्मट आणि उध्दट होता..... बहुदा लवकर यश डोक्यात गेल्या मुळे या अजुन काही ... सगळी भारतीय टीम ने हसमुखाने फोटो सह्या दिलेल्या .. विराट ने नाही...
सचिन सारखा महान सचीन जो विमानात बसल्यावर सदैव हेडफोन घालुन आरामात झोपलेला.. त्याला युवी ने सही देताना कोपर मारुन उठवले..(सचिन नेहमी शांतच असतो आणि शतक केल्याने थोडे ओझे कमी झालेले. असे रैना नंतर मला सांगत होता..माझ्या सीट च्या बाजुला रैना आणि त्याच्या मागे सचिन विंडो सिट वर (तो नेहमी विंडोसिटवरच बसतो) आणि बाजुला युवराज.) आता इतका मोठया खेळाडुला आराम करताना उठवणे सहाजिक तो थोडाफार चिडला असेल असे वाटुन माझा मित्र घाबरुनच गेलेला.. पण सचिन ने काही ही चेहर्यावर दाखवले नाही उलट हसुन सही दिली वर फोटो साठी सुध्दा परवानगी दिली ....फक्त सांगितले "फ्लॅश" न मारता फोटो घ्या...सगळ्यांचे.. घ्या .. पुर्ण विमानात रैना आणि युवी यांनीच प्रचंड दंगा करत होते.. त्यांचे मुख्य टारगेट इशांत ... त्याला मुद्दामुन उठवायचे.. तो उठला की विमानाच्या जवळपास छतालाच पोहचायचा.
विराट ने तोंडावर कॅप ठेवलेली होती त्यामुळे त्याच्या कडे जायचा प्रश्नच आला नाही.....

तोच विराट तोच मित्र यंदाच्या आयपीएल मधे भेटले... या वेळेला मात्र विराट बराच माणसात आलेला बराच म्हणजे जास्तच.. चांगला फरक पडलेला ..... विमानातली आठवण होती.. पण ती त्याने हसण्यावारी नेली.. " गये यार वो दिन.. तु अभी देख मुझे.." .

काळाप्रमाणे विराट मधे चांगले फरक पडत आहेत... हेच त्याचे यशाचे गमक आहे... असे वाटते

fffsd.jpg

विराट जबरी आहे. तोच सचिनचे वनडे चे रेकॉर्ड मोडू शकतो असे वाटते सध्या. अजून थोडे परदेश दौरे कसे करतोय बघायला हवे पण सध्या पोटेन्शियल जबरी दिसते. एवढे करून "पोटेन्शियल" च म्हणतोय त्याचे एकच कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया सोडले तर इतरत्र तो अजून फारसा खेळलेला नाही.

त्याचा खेळ बघायलाही मस्त आहे. सध्या चेसिंग मधली त्याची बॅटिंग आणि त्यातले सातत्य अफाट आहे.

मात्र मीडियाला आता नवीन "सचिन" ची गरज आहे. त्यामुळे बरेच वाद होऊ शकतील असे मुद्दे उकरून काढले जाताना दिसले होते मागच्या वर्षी तरी

खरोखरीच हा खेळाडू काहीतरी विशेष खेळतोय!!! Something special!! पण...

जगभरात असलेली Quality Bowling ची कमतरता हेही एक कारण आहे. मला नाही वाटत Mcgrath, Ambrose, Walsh, Lilee, Imran, Warne, Chandrashekhar, Wasim समोर विराटने असे सातत्य दाखवले असते.

टी-२० चा फायदा नक्कीच जाणवतोय mindset च्या बाबतीत.

रेकॉर्ड मोडणे ही आयडिया हद्दपार होईल काही दिवसात. लाला अमरनाथ च्या काळात टीमबद्दल लिहायला काहीच नसायचं म्हणून क्रिकेटियर्सची रेकॉर्डस लोकांना वाचायला द्यायचे. त्यातून ते महान झाले. प्रत्यक्षात ऑस्ट्रेलिया, विंडीज. द. आफ्रिका, इंग्लंड अशा प्रमुख आणि सीरीयस टीम्स विजयाला महत्व देतात. डॉन ब्रॅडमन हाच असा प्लेयर होता कि (फक्त ५६ टेस्टस मधे २९ सेंच्युरी आणि त्यात ट्रिपल सेंच्युरीही ) ज्याने बॅटसमच्या सेफ्टीसाठीचे नियम अस्तित्वात नसताना पराक्रम गाजवला. इथून पुढं त्याचा काही उपयोग नाही. स्टॅटीस्टिक्स मधे अडकलेल्यांसाठी चाळा होइल तो.

आयत्या वेळी ढेप न खाता प्रेशर मॅनेज करुन अंतीम विजया पर्यंत खेळण्याची विराट ची हातोटी लक्षणीय आहे. बाहेर उसळत्या पीचेस वर त्याच्या बॅटींग चा कस लागेल. बघुयात..

जगभरात असलेली Quality Bowling ची कमतरता हेही एक कारण आहे. मला नाही वाटत Mcgrath, Ambrose, Walsh, Lilee, Imran, Warne, Chandrashekhar, Wasim समोर विराटने असे सातत्य दाखवले असते. >> मला वाटते तेंव्हाच्या खेळाडूंसमोर वेगळे आव्हान असे, आत्ताच्या खेळाडूंसमोर वेगळे. अशी तुलना करणे कठीण आहे. सतत सहाच्या वरचा रन रेट ठेवत खेळणे नि हे वरचेवर करून दाखवणे हे खरच येर्‍यागबाळ्याचे काम नोहे. Best part about Kohli's batting is he still hates dot balls and always ready to scramble for quick singles. This allows him to eat up few ball upfront to settle down to play big innings. He surely has worked out formula for ODI cricket. Lets keep fingers crossed and hope that he wil ldo the same for test cricket.

>>जगभरात असलेली Quality Bowling ची कमतरता हेही एक कारण आहे. मला नाही वाटत Mcgrath, Ambrose, Walsh, Lilee, Imran, Warne, Chandrashekhar, Wasim समोर विराटने असे सातत्य दाखवले असते. <<
असंच काहिसं सचिनच्या बाबतीतहि म्हटलं जायचं.... सचिनला अ‍ॅंडी रॉबर्ट्स, बोथम, लिली, थॉम्सन, गार्नर वगैरेंना कधिच सामोरं जावं लागलं नाहि.... Happy

असंच काहिसं सचिनच्या बाबतीतहि म्हटलं जायचं.... सचिनला अ‍ॅंडी रॉबर्ट्स, बोथम, लिली, थॉम्सन, गार्नर वगैरेंना कधिच सामोरं जावं लागलं नाहि... >> बरोबर त्याच्या आधी विकेट्स कव्हर्ड नसत, त्याआधी सेफ्टी गीयर नव्हते. Happy

बाकी अजुन भारतीयांना, माध्यमांना, समालोचकांना वगैरे तेंडुलकरच्या निवृत्तीतच समाधी अवस्था लाभत आहे म्हणा!

>>>>>>>>.

इथे आपण आपला सचिन... सही आहे... आणि खरेच आहे.. भाई चर्चा तर होणारच Proud

विराट कोहली -

त्याच्या खेळाबद्दल पुढच्या पोस्टमध्ये बोलतो, आधी त्याच्या स्वभावाचे आणि सो कॉलड अ‍ॅटीट्यूडचे विश्लेषण करूया.

हा भारतीय क्रिकेटमध्ये चमकणारा नवा चेहरा, भारताचा युथ आयकॉन न बनेल तरच चांगले.
सचिन, द्रविड आणि गांगुलीचा आदर्श ठेवणार्‍या आमच्या पिढीनंतर पुढच्या पिढीला हा असा आदर्श न लाभल्यास बरे.

मध्यंतरी फेसबूक वर त्याचा एक पार्टीतील फोटो पाहिला होता, त्याच्या टी-शर्ट वर जे अश्लील छायाचित्र होते ते मी इथे प्रकाशित ही करू शकत नाही, तर हा हिरो ते तसले टीशर्ट पार्ट्यांमध्ये घालून त्याचे फोटो फेसबूकावर फिरतील हे बघत होता.

धागाकर्ते बेफिकीर यांनी त्याच्या अ‍ॅटीट्यूडची तुलना दादाच्या अ‍ॅटीट्यूडशी केलेली खटकली, त्याबाबत ती तुलना शाहरुखखानशी करता येईल. मात्र त्यातही शाहरुख उजवा कारण त्यामध्ये प्रगल्भता आहे, तो आधी मेहनतीवर सुपर्रस्टार झाला आहे आणि मग तो स्वताला तसे समजायला लागला.

दादा असो वा शाहरुख यांना पडद्यावर बघणे हा आनंद असतो, मात्र कोहलीचे तसे नाही. जरी त्याच्या खेळामुळे आपण जिंकत असलो तरी त्याचे दर्शन मनात एक चीड उत्पन्न करते. जर तशी ती आपल्या मनात होत नसेल तर आपण कुठेतरी चुकतोय आणि क्रिकेट खेळाच्या प्रेमात वाहावत जातोय हे नक्की.

एक मात्र आहे, विराट कोहलीचे वर्तन आता आपसूक बदलताना जाणवेल, कारण जाहीरातदारांसाठी तो ब्रांड वॅल्यू झाल्याने त्याला तशी इमेज सांभाळावी लागणार, पण तो एक संतुलितपणाचा दिखावा असेल कारण स्वभावाला औषध नसते ते नसतेच. सचिन निवृत्त होताना आपल्याकडील ५ टक्के विनम्रता जरी या मुलाला देऊन गेला तर चांगले.

विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू नसला तरी त्याबद्दल बोलायला आवडते, उद्या परत येतो, त्याच्या ओवरहाईप केलेल्या खेळाबद्दल आणि तंत्राबद्दल थोडे बघूया. Happy

वर मी उल्लेखलेला फेसबूक फोटो, खालील लिंकवर, काल सहज दुसरीकडे हाच विषय निघाला तेव्हा शोधले असता सापडला..

लिंक - http://www.pardaphash.com/news/virat-kohli-tshirt-becomes-a-buzz/711825....

संबंधित बातमी देखील आहे, असा युथ आयकॉन नसला तरच बरे नाही का..

म्हणजे ? एकच भारतरत्न होतं आणि आता ते गेलं! असं वाटत आहे का तुम्हाला सच्चुदा ? Wink देऊ आपण विराट ला पण देऊ हं Happy

जाउ दे फिरत्या ढालीसारखे देउ पाहिजे तर.

गावसकरलाही पद्मविभूषण द्यायचे घाई झाली. अजित वाडेकर ला प्रद्मश्रीची सुद्धा. निदाम सेमी पर्यंत थांबून विराट कसा खेळतो तरी बघायचे. लाला अमरनाथला सुद्धा...

पगार्‍यांनी आपली क्रिकेटची आणि पुरस्कारांची जाण अशी अनवधानाने दाखवून विनोदाला आवतण दिले. आजकाल पगारे असे विनोद बरेच करायला लागलेत.

विशेषतः गांजा प्यायल्याप्रमाणे गोलंदाजी करणारे गोलंदाज संघात असताना .. Lol कोण.. मुनाफ पटेलच्या वेळचा लेख आहे का हा Lol

भारतरत्न पुरस्कार खेळाडुंना देउच नये असे माझे मत आहे पण आता पायंडा पडलायच तर असे करता येईल की खेळाडुंच्या भारतरत्नसाठी वेगळा नियम आखायचा. उद्या एखाद्या भारतरत्न असलेल्या खेळाडुचा विक्रम दुसर्या खेळाडुने मोडला तर पहिल्या खेळाडुकडुन तो पुरस्कार काढुन घेउन दुसर्या खेळाडुला द्यायचा.

भारतरत्न पुरस्कार खेळाडुंना देउच नये असे माझे मत आहे >> खेलरत्न हा त्याच दर्जाचा पुरस्कार खेळाडूंसाठी होता. शिवाय अर्जुन पुरस्कारसुद्धा मानाचा पुरस्कार होता. हे दोन्ही पुरस्कार सचिनला दिले गेले होते. भारतरत्न खेळाडूंना देता येत नसल्याने खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. समान दर्जाचा पुरस्कार दिला गेला असताना घाईत नियम बदलून पुन्हा भारतरत्न दिला जाणे हे प्रत्येकाला आवडेल असे नाही. ज्यांना आवडलेय त्यांचा प्रश्नच नाही.

बहुधा आपण सगळे (आणखीन) एका (किंवा खर्‍याखुर्‍या) सार्वकालीन महान खेळाडूच्या मेकिंगचे साक्षीदार आहोत. 
>>>>

खर्याखुर्या ?
कोहलीचा मोठेपणा दाखवायला धोनीला छोटे दाखवायची काय गरज Happy

कोहलीने कितीही रन मारले तरी जिंकवून धोनीच देतो हे विसरू नका.

एक चहावाला भारताचा आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान होणे, दिल्लीहून आलेला एक स्ट्रगलर एक्टर बॉलीवूडचा आजवरचा सर्वात मोठा सुपर्रस्टार किंग खान शाहरूख खान होणे आणि एक झारखंडसारख्या छोट्या राज्यातून आलेला युवक भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार होणे... या तीन घटनांची साक्षीदार आहे आमची पिढी Happy

Pages