हे माझ्या ग्यालरीत आलेलं सुपारीच रोपट...

Submitted by अर्चना पुराणिक on 30 October, 2013 - 06:45

मी सहज निर्माल्य चुरगळून टाकल्यानंतर आलेलं हे सुपारीच रोपट आणि त्याचा बहर Happy

SAM_5793-001.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!

या फुलाला सुपारीचे फुल म्हणतात एव्हडे माहित आहे. आता खातो त्या सुपारीशी संबध आहे का ते नाही माहित.

शेवंतीच्या वेण्या करताना मधे मधे वापरतात हे. लहानपणी आम्ही घरीच करायचो शेवंतीच्या वेण्या.. आठवणी जाग्या झाल्या Happy

याला सुपारीचे फूलच म्हणतात. अगदी वाळून कोरडे झाले तरी तो जांभळा रंग तसाच तजेलदार रहातो.
खाण्याच्या सुपारीशी याचा संबंध नाही.

प्रथम सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy मला पण याला सुपारीची फुलं म्हणतात इतकच माहित आहे याचा खायच्या सुपारीशी काहीही सबंध नाही हे मात्र अगदी बरोबर Happy वर्षा_म,इब्लिस…. दोघांचेही विशेष आभार Happy वर्षा_म… मला पण मोगऱ्याचे,कुंदाचे,आबोलीचे,कोरांटीचे खूप छान गजरे गुंफता येतात Happy

शेवंतीच्या वेण्या करताना मधे मधे वापरतात हे. लहानपणी आम्ही घरीच करायचो शेवंतीच्या वेण्या.. आठवणी जाग्या झाल्या स्मित>>>>>>>>>>आम्ही पण. Happy
कोकणात याला ''भुतेम' का अस्चं काहीतरी नाव आहे.:स्मित:

मस्तच.

याला सुपारीचे फूलच म्हणतात. अगदी वाळून कोरडे झाले तरी तो जांभळा रंग तसाच तजेलदार रहातो.
खाण्याच्या सुपारीशी याचा संबंध नाही.
म्हणजे हे सुपारी हे फक्त नाम साधर्म्य आहे होय.. मला खरच वाटलं की सुपारी म्हणजे खायच्या सुपारी चं झाड. रंग मस्त आहे. याला गंध पण असतो का?