सण

Submitted by जयदीप. on 27 October, 2013 - 04:02

कधी कधी आपणही नकळत भटकत असतो
त्या हरवलेल्या दु:खांशी भरकटत असतो

सुख पाहुणा.. जाणारच नक्की असतं, आपण
दु:खाला खोली हक्काची बनवत असतो

दु:ख खूप झाले की दुसर्‍याचेही बघतो
अपुले कमी म्हणून स्वतःस सुखवत असतो

सुखात लाख विरघळतो जरी आपण सारे
दु:खाचाच क्षण आपल्याला घडवत असतो

का 'जयदीप' तेवत निवांत नेहमी दिसतो?
तो दु:खाचेही असेच 'सण' मनवत असतो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users