दुवे

Submitted by माउ on 26 October, 2013 - 13:13

सगळे दुवे जोडलेले..
ओली हळवी सन्ध्याकाळ
तुझी चिंब भिजलेली आठवण
माझ्यात बुडलेला तू अन
माझे हरवलेले मी पण..
सगळे दुवे विसरलेले..
ओथंबणारे शब्द तुझे
हातात हात देताना
हळवी नजर तुझी
आश्वासने जागवताना..
सगळे दुवे निखळलेले..
ते पहिल वहिल प्रेम
ती नाजुक अलवार आठवण
निघून गेलेला तू अन
माझ संपलेल मी पण..

Group content visibility: 
Public - accessible to all site users