कवितेनी माझ्या कधी ...

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 24 October, 2013 - 11:43

कवितेनी माझ्या कधी
जग बदणार नाही
मारवाडी माल कधी
स्वस्त विकणार नाही

गल्लीतील दादा कधी
नाका सोडणार नाही
फुटपाथी मला कधी
चालता येणार नाही

तोच माझा पगार नि
हप्ते थांबणार नाही
स्वप्न गाडी बंगल्याचे
संपूर्ण होणार नाही

शब्दांचा अन पोटाचा
मुळीच संबंध नाही
विकुनी कुणी कविता
धनिक होणार नाही

ज्ञानदेव तुकाराम
नाणी चलनी आहेत
प्रकाशका माहित ते
काही मागणर नाही

माझेही यात मित्र हो
चुकले असेल काही
कवी झालो तरी कधी
लाचार होणार नाही

कुणासाठी कश्यासाठी
प्रश्न मला न पडती
नांदतो सदा सुखात
झिंग सोडणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशय चांगला आहे, चांगला व्यक्तही झालाय.

फक्त,
फुटपाथी, विकुनी, प्रकाशका
याप्रकारची शब्दांची रूपे कवितेतील बाकी शब्दांशी विसंगत वाटली.
वैम. कृगैन.