कल्पना-६

Submitted by आशिष पवार on 22 October, 2013 - 01:41

तु झुळुक एक हवेची
मी उनाड वाहता वारा
तु सांज एक पर्वाची
मी मावळती किरण धारा

तु ध्यास जन्मो-जन्मोची
मी विचार अनुत्तरीत प्रश्नाचा?
तु तहान कासावीस जीवाची
मी अतॄप्त प्रेमाचा प्याला

तु खटयाळ पावसाची सरी
मी हास्याचा उन्मत डोंगर
तु गवतावर लवलवणारी दव
मी आभाळ उदार मनाचा

तु वाट नवी जगण्याची
मी घाट वळणा-वळणाचा
तु शोभा माझ्या अंगणाची
मी दिशादर्शक तुझ्या जीवनाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users