स्विस सहल - भाग ६ - रानफुले

Submitted by दिनेश. on 21 October, 2013 - 07:46

आतापर्यंतच्या फोटोत त्या त्या ठिकाणची सुंदर फुले दाखवत होतोच. पण ते निवडक होते. त्यापेक्षा
खास फुले मला जागोजाग दिसत होती. ही तिथली रानफुले मला नदीकाठी, कड्यावर, कपारीत कुठेही दिसत.
यापैकी अगदी थोडीच मुद्दाम लावलेल्या बागांतली होती, बहुतेक अशीच उगवलेली.

मी यावेळेस चांगल्या म्हणजे योग्य वेळी गेलो होतो तिथे, म्हणून मला ही रंगांची उधळण अनुभवता आली.
एरवी तिथल्या अगदी कमी काळातल्या उन्हाळ्यात एक जीवनचक्र या झाडांना पुर्ण करायचे असल्याने,
त्यांना पण घाईच असते.

1.याला जास्वंदीच्या कुळातले म्हणावे का ?

2.फुल आणि सोबतचा फळ / बोंड दोन्ही खास होते - पॉपी

3.हे तर एक सेमीपेक्षा लहान व्यासाचे होते

4.सुंदर रंग पण आकार ३ मिमी एवढाच

5.हे तसे खुप कॉमन फुल आहे. Dandelion

6.मी आधी इथे दिला होता तो या फोटोचा छोटा भाग होता.

7.आपल्याकडे एका मोबाईल फोनवर असे चित्र असते ना ? Dandelion

8.हे त्याचेच फुल Dandelion

9.हा बहुतेक कळा असावा.

10. नदीकाठी हे दिसले

11. काही मंडळी तर मला चक्क हात करायची !

12. हा फोटो अपुर्‍या प्रकाशामूळे नीट आलेला नाही.

13. मला त्या निळ्या फुलाचा फोटो काढायचा होता, तर मागच्या धिटुकल्याने स्वतःवर फोकस घेतला.~
Trumpet Gentian

14.हे पण वरच्यापैकीच, पण ठेवण जरा वेगळी होती. Hawkweed

15.हे पुर्ण उमलल्यावर कसे दिसत असेल ? Bull Thistle

16.पाकळ्यांचा वेगळा आकार , Birds eye primrose

17.हि फुले स्विसमधे " संरक्षित " वर्गातली आहेत. Alpine Saxifrase - only found on alpine rocks

18.अत्यंत अवघड जागी, टिचभर माती असताना अशी फुले दिसत असत. Alpine Daisy

19.हि पण तशीच

20. हि गवताळ रानात दिसत. Geranium

21. अति नाजूक काम.

21. हे तर त्याहून नाजूक प्रकरण

22. आणि हि अनवट रचना

23. हा बहुतेक वेल होता.

24. हे वरच्यापैकीच असणार, पण लांबवर आणि पानाआड दडलेले होते. Trumpet Gentian

25. मोहक रंगछटा

26. डेव्हिल्स ब्रिजजवळच्या कड्यावर हे होते. नेमका अंधार पडत आला होता.

27. हे पण तेच असावे पण दांडोरा आखुड होता.

28. अनवट राग, जरा विस्ताराने

29. हि खुप लांब होती, नीट फोकस करता आला नाही.

30. हि पण नदीकाठी

31. ही पण तिथेच

32. रोज संध्याकाळी तिथल्या म्यूझियमच्या दारातले हे झाड, मला सुगंधी आमंत्रण द्यायचे. ५/१० मिनिटे
तिथे रेंगाळत असे मी.

33. झाडावर असे तुरे होते. तिथे अशी सुंगंधी फुले फारच कमी दिसली.

34. फुलही नाजूक आणि देखणे. मुद्दाम हातावर घेऊन फोटो काढलाय.

35. हे तिथल्याच एका वेलावर होते.

सोनुलीचे खास आभार, काही नावे कळली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, अप्रतिम फुलं.

दुसर्‍या फोटोत आहे ते अफुचं फुल आहे. आणि शेजारी आहे ते अफुचं बोंड. अशीच उगवली होती की काय तत? यांनाच पॉपीची फुलंही म्हणतात बहुतेक करून. पण याच बोंडापासून अफु काढतात का ते माहित नाही.

आणि ते फळंच आहे. फुलाच्या मधला पिवळा भाग नंतर फुल गळून गेल्यावर बोंड बनतो.

आणि ती सगळी पिवळ्या रंगाची शेवंतीसदृश फुलं आहेत ती डँडिलिऑन्स. सुकल्यावर फुलाच्या मधल्या भागाच्या सुकून बिया बनतात (सूर्यफुलासारखंच) आणि त्या वार्‍यावर उडून जातात.

प्रचि 15 - हे पुर्ण उमलल्यावर कसे दिसत असेल?
जांभळे दिसते. Bull Thistle, एक प्रकारचे तण आहे. कृपया प्रची ना आकडे द्या म्हणजे आकडेवर करून या छान फुलांची ओळख कराया येईल.

खूपच सुंदर प्रचि! ही बरीचशी फुले ओळखीची वाटत आहेत, ह्या बर्‍याच फुलांचे वैशिष्ठ्य असे की ही 5000 फुट वरच्या उंचीवर आढळतात. (Alpine Wildflowers). बरेच पर्वत पिंजून काढले असल्याने, थोडी तोंडओळख आहे.
2 - पॉपी
5,7,8 - Dandelion
13,24 - Trumpet Gentian
14 - Hawkweed
15, 23 - Bull Thistle
16 - Birds eye primrose
17 - Alpine Saxifrase - only found on alpine rocks
18 - Alpine Daisy
20 - Geranium

आभार.
सोनुली खास आभार. आता क्रमांक दिले आहेत. मी पुस्तक विकत घेतले आहे खरे पण त्यात ही सर्व नाहीत शिवाय पुस्तकातली बरीचशी मला दिसलीही नाहीत.

सोनुली, आता माझे क्रमांक आणि वरची नावे जुळताहेत का ? तसे असेल तर मी नावे टाकतो.

मामी, अफू नसावी गं ! त्याची फुले लालभडक असतात आणि बोंड जरा मोठे असते. मध्यंतरी मध्य महाराष्ट्रात
चोरीची लागवड पकडली होती, त्यावेळी लोकसत्तामधे फोटो आला होता. त्यांना पॉपी म्हणतात खरे, पण ती
तेवढी नशीली नसावीत !

डँडिलिऑन्स मला आपल्याकडे फार नाही दिसली पण केनयात, न्यू झीलंडमधे आणि स्विसमधे फार दिसली.
त्या बोंडावर जोरात फुंकर मारून ती उडवायची, हा माझा आवडता खेळ.

आणि ६ नंबरचा फोटो खास तुझ्यासाठीच आहे.

अन्जू, अगदी खुशाल.

ऑसम !!!!

सुर्रेख फुले आहेत. प्रत्येकाची ठेवण वेगळी, पाकळ्यांचा आकार वेगळा.
प्रचि. ३१ मधलं फुल खुप आवडलं.