व्याख्या नवी लिहूया , माझ्या तुझ्या जगाची

Submitted by जयदीप. on 19 October, 2013 - 15:06

ना खंत कालचीही, ना काळजी उद्याची
व्याख्या नवी लिहूया , माझ्या तुझ्या जगाची

ती मूक हाक माझी, तू ऐकली जराशी
सुखवून आज गेली मज 'ओ' तुझ्या मनाची

दु:स्वप्न शेवटाचे पाहू नकोस आता
कर एकदा उजळणी तू गोड आठवाची

घडते बरेच काही, सलते बरेच काही
जवळी रहा अशी तू, पर्वा कुणा जनाची !

पुरते तुझी मलाही, माझी तशी तुलाही
ती सावलीच अपुली, चिंता कुणा उन्हाची !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या शेरातील खयाल आणि
"ती सावलीच अपुली, चिंता कुणा उन्हाची?" हा मिसरा
सर्वात विशेष वाटले.

---------------------------------------------------------------------------------------------
शेवटच्या दोन्ही शेरात प्रश्नचिन्हाऐवजी उद्गारचिन्ह संयुक्तिक वाटलं असतं
किंवा कोणतही चिन्ह नसतं तरी चाललं असतं..... वैम.

ती सावलीच अपुली, चिंता कुणा उन्हाची !>>छान मिसरा

दु:स्वप्न शेवटाचे पाहू नकोस आता
कर एकदा उजळणी तू गोड आठवाची ...छान