कणकेच्या सोप्प्प्या खुसखुशीत वड्या
साहित्य :
कणीक - दीड वाटी
गूळ - बारीक चिरून दीड वाटी
तूप - गरजेनुसार
तीळ - एक टेबलस्पून
वेलची पूड - ३/४ वेलच्यांची पूड
कृती -
१) ह्या पाककृती साठी पाक करायची गरज नसल्याने गूळ अगदी बारीक चिरून घ्यावा.
२) एका ताटाला तुपाचा हात लावून ताट तयार ठेवावे.
३) एकीकडे कढईत तुपावर कणीक खरपूस सुगंध सुटे पर्यंत भाजून घ्यावी. गरजेप्रमाणे तूप घालत जावे.
४) कणीक भाजून होत आल्यावर त्यातच तीळ घालून थोडे भाजून घ्यावे.
५) गॅस बंद करून कढई खाली उतरवून मिश्रन गरम असतानाच त्यात वेलची पावडर व गूळ घालावा.
६) कालथ्याने मिश्रण भराभर एकत्र करावे व लगेचच तूप लावलेल्या ताटात काढून सपाट पसरवावे.
७) थापलेले मिश्रण फार थंड होउ न देता लगेचच हव्या त्या आकारात वड्या कापव्या.
मूळ रेसिपी - मंगला बर्वे- अन्नपूर्णा
टीप -
१) वर दिलेले प्रमाण पुस्तकातले आहे. मी करताना मात्र वाटीभर कणकेवरच प्रयोग केला.
२) साखर टाळायची होती म्हणून गुळाचा वापर असलेली गुळपापडीची रेसिपी शोधताना पुस्तकात ही रेसिपी सापडली. एवढी सोपी आहे म्हटल्यावर ती लगेच करायचा मोह आवरला नाही. तुपाचे प्रमाण दिलेले नसल्याने पुरेसे तूप आहे की नाही हे न बघताच कणीक भाजायला घेतली. सगळे तूप संपवून न टाकता मी चक्क अर्धी वाटी तूप आणि उरलेले शेंगदाण्याचे तेल घालून ही रेसिपी केली. त्यामुळे की काय हे माहित नाही पण वडी एकदम कुरकुरीत झाली. पूर्ण तूप वापरून सुद्धा एवढी खुसखुशीत होईल का ते माहित नाही.. पुन्हा प्रयोग केला की मगच कळेल.
३) कणीक भाजायच्या वेळेत चिरलेला गूळ पाउण वाटीच भरला :(.. गुळाची चव कमी-अधीक गोड असतेच त्यामुळे किंचित अगोड आवडत असल्यास ठीक आहे नाहीतर पुस्तकात दिलेल्या प्रमाणाप्रमाणे पूर्ण दीड वाटी गूळ घालावा..
३) फोटो काढायला वड्याही शिल्लक आहेत पण ...
१. सगळे तूप संपवून न टाकता मी
१. सगळे तूप संपवून न टाकता मी चक्क अर्धी वाटी तूप <<<
पूर्ण तूप वापरून सुद्धा एवढी खुसखुशीत <<
मुळात तुम्ही तूप किती घेतले होते ?
२. पुस्तकात दिलेल्या प्रमाणाप्रमाणे पूर्ण दीड वाटी गूळ <<< पुस्तकातले प्रमाण "कणीक - दीड वाटी" आणि "गूळ - बारीक चिरून दीड वाटी" आहे, म्हणजे एकास एक. मग तुम्हांला एक वाटी कणकेला सव्वा वाटी गुळ कमी पडला का ?
आवडलेल्या आहेत. सगळं लागणारं
आवडलेल्या आहेत. सगळं लागणारं साहित्य घरी आहे, करून बघते. मिलिंदाची शंका रास्त आहे, तुझ्याकडचा गुळ कदाचित अगोड असू शकेल, अन्यथा सवापट प्रमाणात पुरेशा गोड व्हायला हव्यात.
मिलिंदा एव्हढी माहिती गोळा
मिलिंदा एव्हढी माहिती गोळा करतो आहेस तर या वीकेंडला होवुनच जाऊदेत वड्या
मिलिंदा, धन्यवाद पहिला
मिलिंदा, धन्यवाद पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल..
तुझी पहिली शंका - पुस्तकात तुपाचे प्रमाण दिलेले नसून 'जरा जास्ती तुपात' एवढंच लिहिले आहे.. त्यामुळे माझ्या एक वाटी कणकेच्या प्रमाणाला साधारण अर्धी वाटी तूप व बाकीचं गरजेप्रमाणे शेंगदाणा तेल वापरून मी वड्या केल्या.. लागेल तेवढं फक्त तूप (तेल अजिबात न वापरता) वापरून वड्या केल्यास तशाच खुसखुशीत होतील का की काही फरक पडेल हे पुन्हा करुन पाहिल्यावरच कळेल..
दुसरी शंका - इथे रेसिपी पोस्ट करायची जरा घाई झाली आणि कंप्युटर बंद केल्यावर माझ्या लक्षात आलं की गूळ पाउण वाटी लिहायच्या ऐवजी सव्वा वाटी लिहिला गेला.. परत येईपर्यंत खूप उशीर झाला होता. तू आधीच चूक हेरून मोकळा झाला होतास.... त्यामुळे आता एडिट करता येतं का ते बघते
सई, गूळ कमी गोड सुद्धा होता आणि हलकी भरून एक वाटीच्या वर पण दाबून बसवल्यावर पाउण वाटी भरला. लेक झोपलेला असताना मिळणार्या अपुर्या वेळात जे काही प्रयोग सद्द्या करता येतात त्यातलाच हा एक होता. पण वडी एवढी आवडली की इथे लिहायचाही मोह आवरला नाही.. पाक करायची भानगड नसल्याने चुकण्याची शक्यता कमी आहे म्हणुन सगळ्यांना आवडेल असं वाटलं.. तूही करून बघ..
गूळपापडी आणि साखरपापडीच्या
गूळपापडी आणि साखरपापडीच्या वड्या एकदम आवडता प्रकार. मी असा कोरडा गूळ घालून कधी केल्या नाहीत. करते लवकरच. रच्याकने, ही रेसिपी याआधी पण २-३ वेळा मायबोलीवर आली आहे.
होणार आणि खाल्ल्या जाणार पण.
होणार आणि खाल्ल्या जाणार पण. खाणार्यांनी मनाची तयारी करायला घेणे
मिलिंदा , ये ते रे उद्या.. तु
मिलिंदा , ये ते रे उद्या.. तु वड्या करून ठेव मी मनाची तयारी...डन!!!
मस्त होते हि वडी. हमखास
मस्त होते हि वडी. हमखास जमते.
कणकेसोबत बेसन, सोयाबीनचे पिठही वापरता येते.
हो दिनेशदा, हमखास जमते असंच
हो दिनेशदा, हमखास जमते असंच वाटलं म्हणून इथे लिहिली..
सिंडरेला, या आधी ही रेसेपी आली असली तर मला कल्पना नव्हती.. आम्ही इथले कधीतरी उगवणारे तारे.. सोपा प्रकार आहे म्हणुन शेअर करावासा वाटला.. त्यातून पाकाशिवाय म्हणजे पटकन झाला..
अॅडमिन, रिपिट असेल तर प्लीज उडवून टाका..
याआधी करून पाहिल्या होत्या.
याआधी करून पाहिल्या होत्या. चुरा झाला नुसता. अजिबात जमल्या नाहीत. गरम कणीक असतानाच गुळ मिसळून वगैरे सगले केले. काय चुकले असेल?
सोपा प्रकार वाटत आहे...करुन
सोपा प्रकार वाटत आहे...करुन बघायला..
वा मस्त .... दिवाळी ला करायला
वा मस्त .... दिवाळी ला करायला हरकत नाही म्हणजे त्या आधि प्रयोग करणे आहे ....आजच करते ....:)
ए मला एकदम उत्साह आला आणी
ए मला एकदम उत्साह आला आणी मी केल्या पण वड्या...ह्या पहा ...
.
सोनचाफा च्या आयडिया नुसार थोडे तेल आणी थोडे तुप वापरुन केले ...
दिसतायत तरी ठिक ठाक ...चव घेतल्या वर कश्या हेत ते कळेलच.....:)
चुरा झाला नुसता.>>>> तूप व
चुरा झाला नुसता.>>>> तूप व गूळ कमी पडले का?
चुरा झाला तरी हादडा मनसोक्त्.
चुरा झाला तरी हादडा मनसोक्त्.:फिदी: कारण सोप्यातली सोपी ही कृती आहे. वड्या करणे हे लाडुपेक्षा कठिण काम आहे. लाडु निदान जमतात तरी , पण वड्या करणे खरच कौश्यल्याचे काम असते. ह्याला कणकेच्या वड्या म्हणा नाहीतर गुळपापडी. माझा आवड्ता नं १ गोड पदार्थ, तो ही गुळातला. साखरेपेक्षा गुळाचे पदार्थ जास्तच खमंग लागतात.
सुहास्य वड्या मस्त दिसतायत्.:स्मित: सोनचाफा कृती उडवायची गरज नाही, कारण घटक तेच असले तरी कृती वेगळी आहे.:स्मित:
लाडु निदान जमतात तरी , >>>
लाडु निदान जमतात तरी , >>> गूळाचे लाडू मला नव्हते जमले. चुरा झाला होता.
सुहास्य, धन्यवाद! अभिप्राय
सुहास्य,
धन्यवाद! अभिप्राय आणि वड्यांचा फोदो, दोन्ही दिल्याबद्दल.. मीही असेच शंकरपाळे कापले होते.. मीच केलेल्या वड्यांचा तू फोटो काढलास असे वाटले
आणि हो, फोटो टाकेपर्यंत ठीक आहे पण इथे येउन पोस्ट करेपर्यंत चव बघितली नाहीस वड्यांची हे फारच झालं की .
अनघा, देवकी, मलाही मिश्रण ताटात काढून मळताना चुराच होणार असे वाटले होते पण गोळा थापत जावून कडा जवळ जवळ करत चेपल्यावर चांगल्या झाल्या वड्या.. गूळ (किंवा बहुत करुन) तूप कमी पडले असणार..
रश्मी, मलाही गुळपापडी प्रचंड आवडते पण कृती माहित नाही. इथे आरतीने फार पूर्वी दिल्याचे आठवत आहे पण शोधशोधी करायचा पेशन्स नव्हता.. आणि पुस्तकात गुळपापडी असा पदार्थ सापडला नाही.. त्यामुळे जे सोपे आणि त्या चवीला जवळ जाईल असे वाटले ते मी करून मोकळी झाले.. गुळपापडीत माझ्या आठवणीप्रमाणे आजी सुक्या खोबर्याचा कीस, शेंगदाण्याचं कूट, खसखस वगैरे घालायची पण नक्की आठवत नाही प्रमाण.. खूप वर्ष झाली त्या खाल्ल्याला पण खूप भारी लागायच्या त्यात.. पण एवढे पदार्थ त्यात भरले तर नक्कीच नुसता गूळ घालून भागणार नाही.. पाकच करावा लागेल असे वाटते..
सोनचाफा तुझ्या आजीचीही कृती
सोनचाफा तुझ्या आजीचीही कृती बरोबर आहे कारण हा पदार्थ पटकन होण्यासारखा असला तरी गुळामुळे ( गुळ उष्ण आणी लोहयुक्त) असे लाडु/ वड्या हिवाळ्यात जास्त केले जात, त्यामुळे त्यात सुके खोबरे किस, सुंठ, खसखस, खारीक असे पण वापरले जात. डिंकाच्या लाडुत कणकेसकट हे पदार्थ असतातच, पण पौष्टीकतेसाठी बाकी वेळा सहज उपलब्ध होणारे म्हणून खोबरे, पोहे आणी खारीक पण वापरली जाते.
मला वाटते ज्या आजी लोकांना पाक सहज जमतो त्या या गुळाचा पाक करुन त्यात कणिक घालुन वड्या करत असतील्.:स्मित:
सोनचाफा माझ्याकडे मराठी टाईप करायला प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे प्रतीसादात जाऊन टाईप करतेय. मनुस्विनी या माबोकरणीने पण या अशा वड्या लिहील्यात. पाहिजे तर बघ एकदा.
मस्तच.........करुनच पहाते
मस्तच.........करुनच पहाते
सो चा ...अग गोडाशी माझा
सो चा ...अग गोडाशी माझा ३६ चा आकडा आहे , त्यामुळे नवर्याने खाउन अभिप्राय देई पर्यन्त धीर नव्हता. पण त्याने जेव्हा टेस्ट केले त्यानतर ३० मीनीटात ताट सफाचट....:)
ह्यावरुन समजुन घ्यावे ...
ही तर trial होती ....अता परत दिवाळीत करिन नक्किच...
मी पण केल्या गुळ १-१/२
मी पण केल्या
गुळ १-१/२ वाटी
आणी पिठ १ वाटी
मस्त गोड खुश्खुशीत झाल्यात
सोनचाफा धन्यवाद!!
सोनचाफा
धन्यवाद!!
कणकेच्या वड्या मनुस्विनी,
कणकेच्या वड्या मनुस्विनी, सीमा आणी दिनेशजींकडुन.
सॉरी मनुस्विनी, सीमा आणी दिनेशजी तुमच्या परवानगीशिवाय मी इथे याबद्दल माहिती देतेय, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मला सोनचाफा आणी तुम्हा तिघांच्याही पद्धती आवडल्या. दिनेशजी मला सोयाबीन विशेष नाही आवडले.:अरेरे: बाकी कुणाला आवडत असेल तर प्रयोग करु शकतील बहुतेक.
Manuswini
Sunday, January 22, 2006 - 7:23 am: Edit Post Delete Post Print Post Link to this message
२ वाटी कणीक
१ वाटी देशी घी,
साल काढलेले बदाम तुकडे,
काजु तुकडे,
वेलची,
१ tbs कच्च दूध
1/2 वाटी किसलेला गूळ
कणीक खंमग तूपात भाजुन घेवुन जराशी लालसर वाटली की त्यात दूधाचा हबका मारायचा किसलेला गूळ टाकुन परतून जरासा घेवुन काजु, बेदाणे, बदाम काप घालुन एका तूपाचा हात लावलेल्या थाळित थापाव्या आणि साधारण गार झाल्यावर वड्या कापाव्या
दुसरी एक पद्धत म्हणजे गूळ घालुन oven मधे 20 minute 300c ठेवुन नंतर वड्या पाडाव्या
दूधाचा हबका मारल्याने खरपुस कणीकेला जाळी पडते कणीक चिकट लागत नाही. पौष्टीक पण आहेत तश्या
मस्त लागतात
Dineshvs
Thursday, August 14, 2003 - 4:31 am: Edit Post Delete Post Print Post Link to this message
लहान मुलना दात यायच्या वेळी गुळपापडीच्या वड्या द्यायची पद्धत होती.त्या गुळाचा पाक करून करत असत.
मी मात्र पाक करत नाही. तीळ, खोबरे आणि खसखस हे तिन्ही कोरडेच गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. प्रत्येकी अर्धी वाटी पुरे. मग प्रत्येकी अर्धा किलो कणीक, बेसन आणि सोयाबीनचे पीठ वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. एकावेळी दोन पीठे वेगवेगळी भाजता आली तर उत्तम. मग हे सगळे एका पातेल्यात एकत्र करावे. जर थंड झाले असेल तर परत जरा गरम करावे. मग त्यात बारीक चिरलेला गुळ,( अर्धा किलो) घालावा. उष्णतेने तो विरघळतो. मग परत थोडे तुप घालावे. व मिश्रण नीट मिसळावे. तुप लावलेल्या ताटात थापुन वड्या पाडाव्या. गुळाऐवजी थोडी काकवी घातली, तर छान चव येते. या वड्या कडक होत नाहीत.
Seema_
Thursday, February 16, 2006 - 4:20 pm: Edit Post Delete Post Print Post Link to this message
चन्द्रिका तुला हीच हवी होती ना recipe?
गुळ पापडी
साहित्य: १/२ कप गव्हाचे पीठ
१/३ कप किसलेला गुळ
१ चमचा दुध
१/२ चमच खसखस
१/४ चमचा वेलची पावडर
४ चमचे तुप
क्रुती
एका ताटाला तुप लावुन घ्यावे. त्यावर खसखस पसरावी.
एका भांड्यात तुप , गव्हाचे पीठ घेवुन ३ ते ४ min साठी MV मध्ये golden brown होईपर्यंत ठेवाव. मधुन मधुन हलवत रहाव.
आता mv मधुन काढुन mixture गरम असे तोवर त्यात किसलेला गुळ,दुध,वेलची पावडर घालाव.
गुळ विरघळला कि हे mixture खसखसिच्या plate वर पसरावे. वाटीन एक सारख करुन घ्याव.
आता चौकोनी तुकडे करुन गार झाल्य्वर खायला घ्याव.
...................................
source :- तरला दलाल च पुस्तक.
सोनचाफा या तिन्ही पद्धती मला जुन्या मायबोलीवर सापडल्या. माझ्या मैत्रिणीने लिंक पाठवली होती. जुने मायबोलीचे फाँट नसल्याने तिने परत पीडीएफ पाठवली होती, त्यातले छापतेय. तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या वड्यांच्या कृतीत हे छापले त्याबद्दल सॉरी, पण तुला माहिती द्यावी म्हणून लिहीले, रागवु नकोस्.:स्मित:
काल मीही केल्या आणि सुरेख
काल मीही केल्या आणि सुरेख झाल्या, फक्त १५ मिनिटे लागली करायला. घरात गुळाची पावडर होती, त्यामुळे गुळ चिरण्याचाही वेळ वाचला. १ वाटी कणीक, एक वाटी गुळ आणि साधारण अर्धा ते पाऊण वाटी तुप - लागेल तसं घालत गेल्यामुळे तुपाचं नक्की प्रमाण सांगता येणार नाही. छान खुटखुटीत आणि खमंग झाल्यात. फोटो काढलाय, पण अपलोड होत नाहीये. टाकते लवकरच. धन्यवाद
रश्मी, अगं रागवायचं काय त्यात
रश्मी, अगं रागवायचं काय त्यात ? उलट काम सगळ्यांचच खूप सोपं झालं.. त्या दिवशी वेळ अपुरा होता आणि पुस्तकात रेसिपी नाही आणि मायबोलीवर नक्की आहे हे माहित असून मी शोधू शकले नाही.. मी ही वरची मनुस्विनी ची रेसिपी वाचल्याचे आठवत होतं पण इथे कसं शोधतात हे माहित नव्हतं.. सगळ्यांच्याच रेसिपीज इथे एकत्र दिल्यास हे खूपच छान.

सई,एस.एम.एस मिळाला.. आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद.. सविस्तर मेल लिहिते नंतर
रश्मी.., इथे पाककृती
रश्मी.., इथे पाककृती कॉपी-पेस्ट करू नका कृपया. त्या त्या पाककृतीच्या लिंका द्या.
ओके मंजूडी. पण आता मी जूनी
ओके मंजूडी. पण आता मी जूनी मायबोली चेक केली तर त्यात हे साधारण युनिकोड मधले असावेत, असे लेखन दिसले पण बाकी फाँट मलाही ओळखता येत नाहीत किंवा उघडताही येत नाहीत. पण सांगीतल्याप्रमाणे लिंक देते.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93013.html?1218407518 ह्या लिंकमध्ये सर्व प्रकारच्या वड्या आहेत. त्यातच मला गुळपापडी सापडली.
आणी यात बाकी गोडांबे आहेत.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/230.html
मी कणकेत मेथी घालते.त्यामुळे
मी कणकेत मेथी घालते.त्यामुळे मेथीचा मस्त स्वाद येतो.