बंद केल्या पांपण्यांना ती दिसावी...

Submitted by मयुरेश साने on 17 October, 2013 - 11:42

आठवण यावी तुझी प्राजक्त व्हावी
अंगणी माझ्या मनाच्या घमघमावी

वास्तवाला ती जरी मंजूर नाही
बंद केल्या पापण्यांना ती दिसावी

स्वागताची तोरणे दारी सुखाच्या
मात्र कुलपाची कधी बनली न चावी

आसवांचा भार झाल्या हुंदक्यांनी
पापण्यांची रोज दारे ठोठवावी

स्वस्त झाल्या वेदनांना हे कळू दे
आसवे नाहीत माझी मानभावी

हरवले आहे जिथे काळीज माझे
त्या तिथे सारी व्यथा हरवून जावी

केवढी गर्दी तुझ्या या आठवांची
नेमका एकांत पाहुन घुटमळावी

काळजाचे व्हायचे ते होत आहे
काळजी आता तुला माझी नसावी

.....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरवले आहे जिथे काळीज माझे
त्या तिथे सारी व्यथा हरवून जावी........वा !

छान