हे न माझे काम आहे - हजल

Submitted by Prashant Pore on 17 October, 2013 - 02:08

कष्ट करणे आणि जगणे, हे न माझे काम आहे
रोजला शेतात झटणे, हे न माझे काम आहे

मी हमेशा नाव लिहितो, आयत्या चित्रातळाशी
कुंचल्याशी संग करणे, हे न माझे काम आहे

पोट सुटता वाढते पत, काय तुजला ठाव आहे?
तालमीला कोण खटणे? हे न माझे काम आहे

आणल्या आहेत गोळ्या, मीच आता नाहण्याच्या
रोजला अंघोळ करणे, हे न माझे काम आहे

लागली ही सवय मजला, काय त्याला मी करावे?
राबताना हाय जगणे, हे न माझे काम आहे

वाटले त्यांना कधी जर, आळशागत मी असा का?
'गुप्त हा तपशील वदणे', हे न माझे काम आहे

ही गझल ही आपली ना, वाटते मज चोरलेली
आठवूनी शब्द रचणे, हे न माझे काम आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद समीर जी...

मला समजले नाही की "हे न माझे काम आहे" असे आपण हजलेतील आशयाशी सहमत आहात म्हणून असे म्हणालात का अन्य काही... Happy

प्रशांत....

आपल्याकडून याहून फारच चांगले लेखन अपेक्षित आहे. तुमच्या क्षमतेशी फारकत घेतलेली गझल्/ हझल आहे.

हमेशा,हाय्,खटणे...हे खटकले.

''हे न माझे काम आहे'' ही रदीफ फार आवडली.

प्रशान्तः

आपली गझल वाचली आहे.
हझलेला वेगळी प्रकृती लागते.
आपल्या हझलेला उद्देशून म्हटले.
अपेक्षा आहे आपल्याला समजेल माझा मुद्दा.

धन्यवाद कैलासजी, समीर जी.

निश्चितच प्रयत्न करेन.. सदर रचना फार जुनी आहे.. अचानक आठवली म्हणून पोस्ट केली.

अपेक्षाभंगाबद्द्ल क्षमस्व... Sad

समीरजी व डॉ.साहेब म्हणत आहेत त्यावर आपण सीरीयसली विचार करणार आहात हे मी जाणतोच
पण मला सांगायचे आहे ते असे के मला ही हझल वाचून फारसे हसू फुटले नाही त्याबद्दलही पॉसिटिव्हली विचार कराच म्हण़़जे हझल करताना लोक हसलेच पाहिजेत ही कला एखाद्या हझल तज्ज्ञाकडून जाणून घ्याच
पुढील हझ्झलांसाठी शुभेछा गझलांसाठीतर आहेतच आहेत Happy