पत्र

Submitted by जयदीप. on 16 October, 2013 - 05:41

ते मला वेडा म्हणाले, मी मला जाणून गेलो
वेड माझ्याहून ज्यांचे, त्यांत मी राहून गेलो

चालण्याआधी कधी मी रांगणे शिकलोच नाही
समजताना मी मला ही नेहमी हरवून गेलो

भासले जेव्हा रिते ते शब्द माझे काल त्यांना
त्याच शब्दांचे नव्याने अर्थ मी सांगून गेलो

कालचे माझेच त्यांना वागणे समजावयाला
मी मला लिहिले जुने ते पत्र मी वाचून गेलो

कोण ते बघणार होते पुस्तके माझी जुनीशी
जात असता आठवांचे पान मी फाडून गेलो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मला लिहिले जुने ते पत्र मी वाचून गेलो<<< ही ओळ आवडली.

इतर शेरांमध्ये अर्थ जरा अधिक सखोल, तीव्र असा काहीसा असायला हवा होता असे वाटले. कृ गै न

मी मला लिहिले जुने ते पत्र मी वाचून गेलो<<< ही ओळ आवडली.
धन्यवाद सर...

सखोल अर्थ सोप्पा करून लिहिण्याचा प्रयत्न केला होता...
नाही जमलं बहुदा.