वानोळा

Submitted by अज्ञात on 16 October, 2013 - 01:02

गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ?
चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा
रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा
अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा

नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा
आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा
पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा
ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ?

........................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह...!!
किती ओळींना दाद देऊ..?

रुधिराचे घर विषम स्वरांचे...>> अफाट..

कर्तव्याचा तोरा>> वाह

आंसवे अभिलाषेची,

गोचिड सम अंगारा>> supreme!

बागेश्री,
अशी एक दाद कवितेच्या जन्माचं सार्थक करून जाते.......... Happy

कैलास, उल्हसजी,
आपल्यासारख्यांमुळे कवितेचं संगोपन होतं. ............ Happy

मनापासून आभार Happy

छान

जाई, समीर, पुलस्ती,मिलिंदा,
मनापासून आभार ......................... Happy