गझल

Submitted by devendra gadekar on 12 October, 2013 - 05:05

एवढ्या साधेपणाने बोलताहे
प्राण हा जाईल माझा,वाटताहे

न्यायधीशा सारखा पाऊस हा,अन
शेत फासा सारखे का ,वागताहे ?

पाहतो फोटोत आईला जसे मी ,
हातची हातात भाकर राहताहे .

ज्या सफाईने कळीचे फूल होते ,
त्या सफाईने मला ती टाळताहे .

एवढे सांभाळले मज वेदनेने ,
की तिला आई म्हणावे वाटताहे . .

बोलतो हृदयातले मी बोलतांना ,
अर्थ त्याचा ती हवे ते लावताहे .

वाटले आली तशी जाईल देवा ,
भूक कोठे पाठ माझी सोडताहे ...

येत जाते दाद जेंव्हा वेदनांची
छांन लिहितो मी असे मज वाटताहे.

नि:शब्द(देव)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त खयाल आहेत!
पण सुप्रियाताईंशी ताहे बद्दल सहमत. बोलते आहे, वाटते आहे असे सहज होईल...