कुठे सांडशी सावली तू उन्हा रे

Submitted by जयदीप. on 11 October, 2013 - 14:30

मना सांग ना , काय माझा गुन्हा रे
कसे ठेवती लोक हाती निखारे

कधी वाटते ,मीच आहे मला रे
कुठे सांडशी सावली तू उन्हा रे

जरी संपली वादळे काल सारी
तरी टोचती आजही क्रूर वारे

जमेलाच मी ज्यांस पकडून होतो
कसे ते...मना...आज करती वजा रे

मला काल ज्यांनी दिले आसरेही
बळे तोडती आज माझे निवारे

जरा पुण्य ही आज पदरी नसावे
असे काय मी पाप केले मना रे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy