दु:ख-सुख (कविता)

Submitted by UlhasBhide on 11 October, 2013 - 08:42

दु:ख-सुख (कविता)

खुळ्या आसवांनो तुम्ही शिंपल्याने फुले का मनाचा कधी ताटवा ?
चवीने जरी चाखले मीठ त्याने मिळे का जिभेला कधी गोडवा ?

असो दु:ख प्यारे कवींना कितीही, नसे आस त्याची कधीही कुणा
“विधात्या मला दु:ख दे भरभरूनी”, कुणी मागती का असा जोगवा ?

विडी ओढुनी धूर सोडून द्यावा तसे दु:ख काही कवी फुंकती
खपे ते विकावे अशा धारणेने जणू शोध घेती सुखाचाच वा

खर्‍या जीवनी दूषणे त्याच दु:खास साहित्यप्रांती प्रतिष्ठा मिळे
तर्‍हेवाइकाच्यापरी वागण्याची तुझी आकळेना तर्‍हा मानवा

दुज्यांच्या व्यथांचा रसास्वाद घेता मनी डाचतो प्रश्न माझ्या सदा
उगाळून दु:खे स्वत:ची मिळे का कधी चंदनाच्यापरी गारवा

…. उल्हास भिडे (११-१०-२०१३)

---------------------------------------------------------------------------------------------
सदर कविता/रचना गझलेच्या आकृतीबंधात असल्याने
वाचकवर्गात 'गझल विभाग' समाविष्ट केला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर्‍या जीवनी दूषणे त्याच दु:खास साहित्यप्रांती प्रतिष्ठा मिळे
तर्‍हेवाइकाच्या परी वागण्याची तुझी आकळेना तर्‍हा मानवा

दुज्यांच्या व्यथांचा रसास्वाद घेता मनी डाचतो प्रश्न माझ्या सदा
उगाळून दु:खे स्वत:ची मिळे का कधी चंदनाच्यापरी गारवा<<< वा वा वा

>>
दुज्यांच्या व्यथांचा रसास्वाद घेता मनी डाचतो प्रश्न माझ्या सदा
उगाळून दु:खे स्वत:ची मिळे का कधी चंदनाच्यापरी गारवा
<<
Happy

'तर्‍हेवाइकाच्यापरी' एक शब्द हवा ना?

धन्यवाद स्वाती.
'तर्‍हेवाइकाच्यापरी' एक शब्द हवा ना? >>>> टायपो होता. (चंदनाच्यापरी बरोबर टाइपले पण इथे चूक झाली.)
आता बदलतो.

वा! गेयता खूपच आवडली..

दुज्यांच्या व्यथांचा रसास्वाद घेता मनी डाचतो प्रश्न माझ्या सदा
उगाळून दु:खे स्वत:ची मिळे का कधी चंदनाच्यापरी गारवा.. हे खासच! Happy

वा सुंदरच. आवडत्या वृत्तातील कविता. छान शब्दकळा.

दुज्यांच्या व्यथांचा रसास्वाद घेता मनी डाचतो प्रश्न माझ्या सदा
उगाळून दु:खे स्वत:ची मिळे का कधी चंदनाच्यापरी गारवा

अप्रतिम.

क्या बात उल्हासजी! परदु;ख शीतल ..
खर्‍या जीवनी दूषणे त्याच दु:खास साहित्यप्रांती प्रतिष्ठा मिळे
तर्‍हेवाइकाच्यापरी वागण्याची तुझी आकळेना तर्‍हा मानवा

अगदी आवडली कविता.

दुज्यांच्या व्यथांचा रसास्वाद घेता मनी डाचतो प्रश्न माझ्या सदा
उगाळून दु:खे स्वत:ची मिळे का कधी चंदनाच्यापरी गारवा >> शेर आवडला !

खर्‍या जीवनी दूषणे त्याच दु:खास साहित्यप्रांती प्रतिष्ठा मिळे
तर्‍हेवाइकाच्यापरी वागण्याची तुझी आकळेना तर्‍हा मानवा

>> सत्यवचन!!

भरत,
व्वा ! काय प्रतिसाद दिलात ! खूप आवडला. Happy धन्यवाद.
खरं तर ’दळण’ हा तुमचा एक जुना प्रतिसादही चालला/आवडला असता.
पण प्रतिसादातही तुम्ही वैविध्य राखलंत.... मान गये उस्ताद. Happy
आणि त्या निमित्ताने का होईना, कदाचित काही लोक ती रचना वाचतील यासाठी धन्यवाद.

अशी दळणं मी काही एकटाच दळत नाही.
मायबोलीत तसेच मायबोलीबाहेर देखील अनेक असू शकतील.
असो.... विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न मी करतो, नव्हे अनेकदा केलाही आहे.

एनिवे..... माझी कविता वाचलीत, प्रतिसाद दिलात हेच माझ्या दृष्टीने खूप आहे.
बाकी वैयक्तिक संपर्कातून/फोनवर बोलूच.

पुन्हा एकदा धन्यवाद.

धन्यवाद वैभव फाटक.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
खरंतर मी ही कविता म्हणून लिहिली. शीर्षकात तसे नमूदही केले आहे.
फक्त आकृतीबंध गझलेचा असल्याने वाचकवर्गात 'गझल विभाग' समाविष्ट केला.
काही प्रतिसादांत गझल/शेर असे उल्लेख आल्याने हे पुन्हा सांगावेसे वाटले.

असो.... सदर रचना गझल म्हणून संबोधिली गेली तरी माझी काहीच हरकत नाही, मला आनंदच वाटेल.
गझल हा काव्याचाच एक प्रकार.... मला तो कवितेइतकाच आवडतो.

दुज्यांच्या व्यथांचा रसास्वाद घेता मनी डाचतो प्रश्न माझ्या सदा
उगाळून दु:खे स्वत:ची मिळे का कधी चंदनाच्यापरी गारवा

व्वा.

छान आहे.
>> असो दु:ख प्यारे कवींना कितीही, नसे आस त्याची कधीही कुणा
“विधात्या मला दु:ख दे भरभरूनी”, कुणी मागती का असा जोगवा ? >> जास्त आवडले.

सुंदर!
विडी ओढुनी धूर सोडून द्यावा तसे दु:ख काही कवी फुंकती
खपे ते विकावे अशा धारणेने जणू शोध घेती सुखाचाच वा>>>>खास.

Pages