निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी... वॉव.. कथेतलं दृष्य दिसतंय.. मज्जा आली असेल या रस्त्यांवरून चालताना..

दिनेश.. सॅक म्हंजे पोतं?.. नाय ब्वा..पोत्यात कपडे भरून आण्णं न्हाय जमायचं.. Wink

शशांक, फोटो दाखवून मला डिवचलेय बरं का. आता मुद्दाम त्या बागेसाठी जाईन >>>> दिनेशदा - तुम्ही तिथे जरुर जा - तुम्हाला फारच आवडेल ती बाग....
रच्याकने तुमच्या कॉलनीतल्या बागेचे फोटोही मस्तच ...

मानुषी - सर्व फोटो सुंदरच...

गौरीने स्वहस्ते बनवलेला आकाशकंदीलही सुरेखच ......

इथेच परवा एक अगदी जायंट साइझ बेडुक दिसला होता. काय पर्सनॅलिटी होती! >>>> मानुषी Happy Wink
बेडुकॅलिटी हा शब्द जास्त बरोबर होईल .... माणसं फार बेंगरुळ असतात त्याच्यापुढे - असं माझं म्हणणं नाहीये - एका नृत्यातील ख्यातनाम दिग्गजांचे म्हणणे आहे - त्यांच्या शिष्यांना ते आधी नीट उभे कसे रहायचे ते शिकवायचे - त्याकरता ते म्हणायचे की बेडुक देखील अतिशय डौलदार बसतो, आणि माणूस असून तुम्हाला नीट उभे देखील रहाता येत नाही !!!- आधी नीट उभे रहायला शिका, नीट चालायला शिका, नीट हातवारे करायला शिका - बाकी नृत्य वगैरे नंतर बघता येईल .... Happy

मी पाहिलंय - साधी माशी काय, नाकतोडा काय - सगळे सगळे अग्दी मस्त - नैसर्गिक पोज घेऊन बसलेले असतात... आपण माणसे फारच कसे तरी दिसतो त्यांच्यापुढे .... Happy Wink

काल संध्याकाळी एक गंमत पाहिली - वसूबारसेनिमित्त पुण्यात अनेक ठिकाणी ते गाय-वासरु पूजन चालू होते...

एके ठिकाणी तो गायीचा मालक ओरडत होता - फक्त पूजा करा, ते खायला वगैरे काही देऊ नका... मी त्याला हळूच बाजूला घेऊन विचारले तर तो म्हणाला - अहो, हे पोळी वगैरे काही या गाईचे अन्न नाहीये - एखादी पोळी ठीके पण या इतक्या पोळ्या आणि गोडाधोडाचे खाऊन पोट बिघडेल ना गायीचे !!!.... या शहरी लोकांना काय कळणारे यातले ???..... Happy Wink

भोसले, वेगळी कृती लिहिलीय.

काल मी झाडावरचा पिकलेला आंबा हाताने तोडून खाल्ला. असे झाडावरचे पिकलेले फळ तोडून खाण्यातली
मजा काही औरच असते. त्याची सर बाजारात ( मुद्दाम पिकवलेल्या ) फळाला येणे शक्यच नाही.

अगदी खर आहे दिनेशदा, करवंदे जालितून तोडून खायला काय मज्जा येते , ती विकत घेऊन खाण्यात नाही

वर्षू, खोटे वाटेल पण माझ्या ( आणि कदाचित शोभा / प्रज्ञाच्याही ) लहानपणी कोकणात डाळींबाची झाडेच नव्हती. बाजारातही ती क्वचितच असत. पुढे कमी पावसाच्या प्रदेशात त्यांची लागवड यशस्वी झाली व नवीन
जाती आल्या त्यावेळी ती बाजारात मिळू लागली. तरी अजून कोकणात विशेष दिसत नाहीतच.

आमच्या एम पी त ही झाडं भरपूर होती ,प्रत्येक घरात .पण.मित्रांच्या बागेत घुसून त्यांच्या

बागेतल्या झाडांवर डल्ला मारण्याची मजा काही औरच... लांब वरच्या अंधार्‍या स्वैपाकघराच्या अरुंद खिडकीतून एखादी काकू,मावशी ही आम्हाला पाहून न पाहिल्यासारखं दाखवी.... Happy

कितीतरी दिवसांनी आले...मस्त वाटलं.
मानुषी समुद्रकिनार्‍यावर गेलीस की नाही कशेळीच्या? अप्रतिम नजारा दिसतो तिथे.Rut5915.jpg
असा काहीसा...

आणि तिथली पाणी काढायची ही सिस्टम. हिला काय म्हणतात कुणी सांगेल का?
Rut5906.jpg

हल्ली आमच्याकडे कपडे धुवायच्या पाथरीवर कावळे रोज आणून काहीतरी टाकतात..मासे इ. खाल्लेलं नसतं आणि खायला येतपण नाहीत नंतर. काल सकाळी मी काढून टाकलं तर दुपारी दुसरं काहीतरी आणून टाकलं होतं. जसं काही रिकामी पाथर बघवत नाही अशा प्रकारे. हा काय प्रकार आहे काही कळत नाही...

हं........अगं पिशी गेली कित्येक वर्षं कशेळीला गेले की बीचवर जातोच आम्ही सगळे! अगदी व्हर्जिन म्हणावा तसा किनारा आहे. सुंदर! आणि बीचवर जाण्यासाठी आमच्या घरापासून थोडा डोंगर चढावा उतरावा लागतो ती आणखी एक वेगळीच मजा. पण यावर्षी नाही जमलं!
हो आणि या पाणी काढण्याच्या सिस्टीमला काहीतरी म्हणतात(स्पेसिफिक नाव) बहुतेक विचारून सांगते.
आणि वरचा फोटो कनकादित्य मंदिरातलाच का?

हं.......काही वेळा कावळ्यांचं वागणं अगम्यच असतं!
काल कडुलिंबावरून काहीतरी वेगळाच कर्कश्य आवाज आला. पटकन लक्षात आलं की हा नेहेमीचा पक्षी नाही.
पळत जाऊन पाहिलं तर एक जोडी लिंबावर बसलेली. नाहीच कळलं कोणता पक्षी ते. चोच थोडी लांब आणि बाकदार. राखाडी रंग. भारद्वाजापेक्षा मोठा. मी गच्चीत गेले तर दोघेही उडून गेले. चांगले लांब मोठे पंख होते. हॉर्नबिल नक्की नसावा. (आमच्या नगरात ?)खूप चुटपुट लागली.

वा काय मस्त लाडू आहेत. तों.पा.सु.

>>मी पाहिलंय - साधी माशी काय, नाकतोडा काय - सगळे सगळे अग्दी मस्त - नैसर्गिक पोज घेऊन बसलेले असतात... आपण माणसे फारच कसे तरी दिसतो त्यांच्यापुढे .... >>> अगदी खरं

आपल्या दिवाळी अंकात आलेली माझी कविता
http://vishesh.maayboli.com/node/1336

कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरिपासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे. आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे.

कशेळीचा कनकादित्य Happy

अय्या जागू! परत आले हे तुझ्याकडे पाहुणे? Happy

माझ्या ग्रिल्समधलं कबुतराचं पिल्लू मोठ झालं. बहुतेक उडालं आता कारण कालपासून दिसत नाहिये. आता ग्रिल्स आणि खालचा सज्जा घासून धुवायला हवाय. भरपूर सडा घातलाय Sad

Pages