कायम तिच्या घराला बघतो वळून रस्ता...

Submitted by मयुरेश साने on 10 October, 2013 - 04:02

ती तर निघून गेली छळतो अजून रस्ता
कायम तिच्या घराला बघतो वळून रस्ता

सेतू मनामनाचा जावा बनून रस्ता
केव्हा तरी तिला ही यावा कळून रस्ता

रस्त्यातल्या चुकांनो हा दोष यौवनाचा
आहे तरूण रस्ता जातो चळून रस्ता

हा पूल पादचारी अंगावरून जाता
गेला किती बिचारा हा अवघडून रस्ता

गर्दीत आठवांच्या मी एकटाच आहे
डोळ्यात आज माझ्या आला भरून रस्ता

तू भेट या जिवाला बुजवून खाच खळगे
येईल बघ कसाही मग सळसळून रस्ता
............................................

(माझ्या मुशाफिरीला आला कळून रस्ता
कायम तिच्या घराचा बघतो वळून रस्ता )...असाही मतला करावा वाटला होता

....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती तर निघून गेली छळतो अजून रस्ता
कायम तिच्या घराला बघतो वळून रस्ता<<< वा वा

एकदम उर्दू स्टाईल

तू भेट या जीवाला<<< जिवाला असे करावे लागेल.

महान हझलकार कैलासवासी श्री तिलकधारी यांची ही गझल आठवली.

मतला जानकुर्बान बाकीचे शेरही छानच जमले गझल आवडली मयुरेश

हा पूल पादचारी ... हा शेर मुंबैत ते कय ते स्काय्वॉक नावाचं प्रकरण आहे त्यावर बसून केलास बहुधा Happy

आठवांच्या गर्दीवरून माझा एकशेर आठवला ....

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या
_____________________________
कै.तिलकधारीजींची ती बेहतरीन गझल मलादेखील ही गझल वाचताना सारखी आठवत होती इथे दिल्याबद्दल धन्यवाद बेफीजी ..पुन्हा एकदा वाचून पुन्हा एकदा खूप छान वाटले
'डोळे मिटून रस्ता ' काय शेर आहे त्यातला वाह !!

मतला सुरेख आवडला (मुळ आणि दुसरापण)

तू भेट या जिवाला बुजवून खाच खळगे
येईल बघ कसाही मग सळसळून रस्ता
>>>>>>>>>>>>>>

तू भेट काळजातिल बुजवून खाच खळगे
जाईल बघ कसा हा मग गजबजुन रस्ता

निलिमा चांगला प्रयत्न

खालच्या ओळीत असे करा

जाईल बघ कसा मग हा गजबजून रस्ता

जू दीर्घ हवा मग वृत्तात बसेल Happy

वैभव वसंतराव कु... | 12 October, 2013 - 13:08नवीन
निलिमा चांगला प्रयत्न
खालच्या ओळीत असे करा
जाईल बघ कसा मग हा गजबजून रस्ता
जू दीर्घ हवा मग वृत्तात बसेल

>>> आभार! Happy