आज तू जाऊ नको गं

Submitted by जयदीप. on 8 October, 2013 - 11:26

आज तू जाऊ नको गं
हात हा सो डू नको गं

सूर छेडूया नवे , तू
जायचे गाऊ नको गं

श्वास दे श्वासास माझ्या
दूर तू राहू नको गं

ऐकली स्पर्शातुनी ती
स्पंदने विसरू नको गं

लाजुदे सारी फुले, तू
पाकळ्या मिटवू नको गं

मोकळी ती राहू दे, तू
बट पुन्हा सारू नको गं...

Group content visibility: 
Public - accessible to all site users