कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा - कविता

Submitted by अविकुमार on 8 October, 2013 - 06:32

बेफिकीर यांनी कवी रसप यांची ओळ (कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा) तरहीसाठी घेतली जावी असे येथे (http://www.maayboli.com/node/45373#comment-2899499) सुचवले आहे.

वॄत्तबद्ध गझल लिहीणे आम्हाला आयुष्यात कधीच जमले नाही (आम्हाला!.. सरांची आठवण झाली. कोणते सर हे जाणकार जाणतातच!). पण ती ओळ वाचता वाचता काही खयाल सुचले म्हणून त्यांची ही कविता!

तरही गझलांची आतुरतेने वाट पहात आहेच.
----------------------------------------------------------------

कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा
चुकार भरल्या आसवापरी हळुच मग ओघळून जा

उमेदीच्या पंखबळावर, गाठशील प्रकाशास जेव्हा
सोडूनी पंख मागे जगा, खूशाल मग तू जळून जा

वसंत बहरला मनात माझ्या आठवफुलांचा तुझ्या
विरहवणवा शमविण्या माझा, एकदाच गं दरवळून जा

अभिमानाने वागवतो मी, घाव तुझे मनावरती माझ्या
सवय रहावी मजला त्याची, म्हणून तरी भळभळून जा

न कसली मागणी आयुष्यभर, अपेक्षा न कसली कधी बोललो
सहवेदना म्हणून एकदातरी, चितेवर माझ्या कळवळून जा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users