थोडा जगेन म्हणतो

Submitted by जयदीप. on 8 October, 2013 - 04:13

रोज रोज मरताना, थोडा जगेन म्हणतो
नको नको करताना, थोडा रमेन म्हणतो

व्हायचेच होते जे, होऊनच गेले ते
थांबले ना रडूनी, थोडा हसेन म्हणतो

नकोच आता बुरखे, झाले खूप चेहरे
जसा 'खरा' आहे मी, थोडा दिसेन म्हणतो

खूप झाले राग त्यांचे, खूप ते तराणे
माझे एक गीत नवखे गुणगुणेन म्हणतो

'काल'च्या त्या घड्या घट्ट, तश्या झाल्यात ढिल्या
आज मलाच 'मी' जरासा उलगडेन म्हणतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users