प्रेम जर नाही तिच्यावर

Submitted by मयुरेश साने on 8 October, 2013 - 03:56

प्रेम जर नाही तिच्यावर
का तिचा स्वप्नात वावर

मोह का होतो अनावर
बघ तुला मी पाहिल्यावर

लोचनांना मेजवानी
आळ येतो काळजावर

या मनाचा नेम नाही
कोणत्या वेळी कशावर

फक्त ताटातूट उरते
या तिरावर त्या तिरावर

केवढा आकांत होतो
एकटेपण वाढल्यावर

वाटते आकाश सारे
टांगलेले एक वावर

काय होते कोण जाणे
एकदाचे संपल्यावर

....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का लिहीशी आर्त इतके
थोडेसे आताच सावर

एक छोटे हास्य देणे
तुही आता घे मनावर

(हे उगीच आहे बरंका..सहजच आपलं Happy )

फक्त ताटातूट उरते
या तिरावर त्या तिरावर

केवढा आकांत होतो
एकटेपण वाढल्यावर

वाटते आकाश सारे
टांगलेले एक वावर

काय होते कोण जाणे
एकदाचे संपल्यावर<<<

व्वा व्वा! मनोरमा वृत्तातील एक छान गझल!

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

छान

प्रेम जर नाही तिच्यावर
का तिचा स्वप्नात वावर

लोचनांना मेजवानी
आळ येतो काळजावर

या मनाचा नेम नाही
कोणत्या वेळी कशावर

फक्त ताटातूट उरते
या तिरावर त्या तिरावर

केवढा आकांत होतो
एकटेपण वाढल्यावर

काय होते कोण जाणे
एकदाचे संपल्यावर

वा वा वा मजा आया !
======================

माझा एक शेर आठवला

या मनाचा भरवसा दयावा कुणी....
हे कुणावरही कधी भाळेल ना !

-सुप्रिया.

वाह !!

झक्कास गझल!

केवढा आकांत होतो
एकटेपण वाढल्यावर

काय होते कोण जाणे
एकदाचे संपल्यावर

वा मयुरेश वा!!

प्रच्चंड आवडली गझल, मयुरेश.
छोट्या बहरमधे लिहिणं किती कठिण आहे (माझ्यासारख्या फापटपसार्‍याने लिहिणारीला तर कित्ती कित्ती) आणि हे असं जमलं की.. किती चपखल अन थेट.
मजा आया.

फक्त ताटातूट उरते
या तिरावर त्या तिरावर

केवढा आकांत होतो
एकटेपण वाढल्यावर

काय होते कोण जाणे
एकदाचे संपल्यावर
... बहोत बहोत खूब.

<<<<मेजवानी शब्द नाही आवडला फक्त (का ते माहित नाही)>>>

दाद द्यायची अशीही एक पध्द्त आहे रीया Happy

प्रेम जर नाही तिच्यावर
का तिचा स्वप्नात वावर

मोह का होतो अनावर
बघ तुला मी पाहिल्यावर

एकदम झकास