बॉटलनेक

Submitted by बेफ़िकीर on 7 October, 2013 - 04:56

माझ्या हाडांवर शेवाळे कवितांचे
अर्थ सटकती सरळ चालत्या शब्दांचे

माझ्या रक्तामध्ये बुडलेले अनुभव
उसळत करती रोज साजरा काव्योत्सव

चरबी चढते परदु:खाने रडताना
हृदय थांबते मजवर हृदये जडताना

घसा राखण्या ग्रंथींचे हेवेदावे
लाळेपेक्षा अश्रूंनी तो ओलावे

समुद्र वर्तवण्या मुख आहे केवळ एक
अनुभूतींच्या वाहतुकीची बॉटलनेक

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घसा राखण्या ग्रंथींचे हेवेदावे
लाळेपेक्षा अश्रूंनी तो ओलावे

समुद्र वर्तवण्या मुख आहे केवळ एक
अनुभूतींच्या वाहतुकीची बॉटलनेक

व्वा!

झकास...

आत्मपरिक्षण ?

असं स्वत:च्या अंतरंगात बुडी मारून त्रयस्थपणे व्यक्त होणं कर्मकठीणच !
अप्रतिम कविता !

धन्यवाद !

-सुप्रिया.

मस्त !

छानै....

घसा राखण्या ग्रंथींचे हेवेदावे
लाळेपेक्षा अश्रूंनी तो ओलावे

वावा!
नेसोलॅक्रिमल डक्ट पेटंट हो तुमचं! उगंच नै लॅक्रिमल ग्ल्यांड्स अन सलायव्हरी ग्ल्यांड्स हेवेदावे करीत! डीसीआर ऑप्रेशनचं एक गिर्‍हाईक हुक्लं तर हुकू देत हो. डक्ट्स पेटंट असण्याचं सुख कवितेतून मांडताय.. कस्ले गुणी आहात Wink (जावैबापू, नर्ड्यात मज्जा हो तुम्च्या : या टोनमधे वाचावे)

:गालावरून हात फिरवून कानशिलावर बोटे मोडणारी भावली:

(बेफि, दिवे घ्या. डोळ्यातले अश्रू २४ तास घशात उतरत असतात ही नॉर्मल फिजिऑलॉजी आहे. तुमच्या या शेराच्या मेडीकल अर्थाने वरचा रिस्पॉन्स लिवलाय. म्हणजे घसा ओलावण्यासाठी लाळे(अन दारू)व्यतिरिक्त अश्रूही कारणीभूत असतात हे शास्त्रीय सत्यही आहेच.)