नेमक्या वेळी नको ते आठवे

Submitted by मयुरेश साने on 7 October, 2013 - 00:35

हुंदक्यांनी लाख केली आर्जवे
सारखे ओठावरी आसू हवे

आसवांचा आड पडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे

रंगलो नाही कधी जागेपणी
कोण देतो रंग स्वप्नांना नवे

छाटल्या फांद्या निराशेच्या किती
एवढेसे सूख आता पालवे

संप दंगा घोषणा झाल्या सुरू
जो इथे खाईल त्याला खवखवे

लोक सारे वाटती आता मला
पारधी निवडून देणारे थवे

लाट प्रेमाची नसे साधीसुधी
बेट प्रेमाचे तिलाही जाणवे

विसरणे असते तसे सोप्पेच पण
नेमक्या वेळी नको ते आठवे

....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशय गझलेचा माझ्या तिला समजतो हल्ली
गझल वाचते माझी मी जिला वाचतो ह ल्ली

आशय गझलेचा माझ्या मला समजतो हल्ली
तिचा चेहरा दिसतो आणी मिसरा सुचतो हल्ली

आशय गझलेतुन माझ्या डोकावत असतो हल्ली

जाणीव कुणा परक्याची दोघात बहरते आहे
अपसूक जुन्या नात्याची तब्बेत बिघडते आहे

अलवार तुझ्या मौनाचे हे गूढ उकलते आहे

चाहूल लागते आणी मन सैरावैरा होते
फू ल उ म ल ते आहे