सल्लागार (गझल )

Submitted by devendra gadekar on 6 October, 2013 - 12:22

याच गोष्टीचा मला आधार होतो .
तू दिलेला घाव सल्लागार होतो .

एवढे मजबूत चल नात्यास बनवू,
चंद्र हो तू,मी तुझा अंधार होतो .

एवढे तर जाणतो मी,वेळ येता
बाप आईच्या दुधाची धार होतो.

गाडले शेतात का माझे कलेवर ,
काय तेथे मी पुन्हा उगणार होतो .?

ना कधी येऊ दिले ओठावरी मज ,
मी तिच्यासाठी तिचा होकार होतो…!

नि:शब्द(देव)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ं मस्त.

याच गोष्टीचा मला आधार होतो .
तू दिलेला घाव सल्लागार होतो .

एवढे मजबूत चल नात्यास बनवू,
चंद्र हो तू,मी तुझा अंधार होतो . >>> सुरेख !

छान

देवा..........!!

एवढे मजबूत चल नात्यास बनवू,
चंद्र हो तू,मी तुझा अंधार होतो .

एवढे तर जाणतो मी,वेळ येता
बाप आईच्या दुधाची धार होतो.

गाडले शेतात का माझे कलेवर ,
काय तेथे मी पुन्हा उगणार होतो .?

ह्या तिन्ही शेरांसाठी तीन कड्डक सॅल्युट !!
__/\__