आई

Submitted by पंकज२२८४ on 5 October, 2013 - 07:19

आई, सुटी संपवून,गणवेश चढवून सीमेवर जाताना, तेव्हा तुझ्या डोळ्यातली आसवं काळजातून यायचीत कळायचं मला. . . . . . आई.. . . . . . . . . देशप्रेम वगैरे नव्हतं मनात.. . . . . . . . राब राबून काळ्या आईच्या कुशीतून चार दाणे काढता काढता. . . .. . . . . . . ऊसाच्या चिपाडागत झालीस तू. बाबा गेला देव नसलेल्या आभाळात., मला नि बानीला कुणी गेल्यावर रडायचं असतं हे न कळण्याच्या वयात... . . . . . . . आई ,तुझ्या कष्टांना पूर्णविराम देण्यासाठी सीमेवर शत्रूचं प्रश्नचिन्ह झालोय बघं... .... . नि अनायसेच या मातेची सेवा होतेय बघ. . . . . . . आई,थोड्याच वेळात शहीद म्हणून माझ्या नावापुढे उद्गार चिन्ह लागेल नि तुझ्या काळजाच्या अंधाऱ्याी खोल विहीराचा तळ आणखी खोल... . . . . . . . आई ... . .वर आभाळात... . . बाबा ... . .भेटेल ना गं?... .

Group content visibility: 
Public - accessible to all site users