आणि वाटतंय तर वाटून घ्या......

Submitted by मी मी on 1 October, 2013 - 08:07

आयुष्यात काही गोष्टी कळायला जरा उशीरच होतो … नाही ?
'श्या, आपण हे आधीच करायला हवे होते किंवा आपण उगाच यात आत का शिर्लोत? ' असले प्रश्न एका टप्प्या नंतर टप्प्या टप्प्या ने येत राहतात मनात, उत्तर शोधायला मात्र फार उशीर झालेला असतो. कधी कधी या गोष्टी फार सिचुवेशणल आठवतात. जश्या जश्या परिस्थितीतून आपली गाडी घरंगळत, धूर सोडत जात असते त्या त्या रस्त्यावर येणारे खड्डे, साठलेला गाळ, हेतुपुरस्सर करू घातलेले स्पीडब्रेकर आणि बरेच काही....तर...जसे जसे आपण आदळत, आपटत पुढे जात असतो तसे तसे कधी असे खाडकन डोळे उघडावे किंवा मेंदू नावाच्या चीटूकल्या संस्थेला झणझणीत झटका लागावा अश्या घटना घडतात, घडतात.....आणि घडत राहतात...
हं! तसतसे म्हणे आपण शहाणे होत जातो. आता शहाण्या मेंदूचे नखरे हजार असंच काहीसं मग मागच शहाणपण पुढे पुढे आठवू लागतं.

एकदा अशीच मी आजारी पडले. काही दिवस घेत राहिले किडूक मिडूक काहीतरी औषध. पण गुण काही येईना. आधी औषध आणि नंतर डॉक्टर सुद्धा बदलून पहिले. पण निदान काही लागेना.....घशात दुखतंय...एका कोपर्यात एवढच काय ते मला माहिती. साधासा तर प्रश्न आहे त्यासाठी हे डॉक्टर इतके दिवस कसले लावतात. जेवढे दिवस हे उशीर लावत आहेत इतक्या दिवसात तर मी अशी आपसूकच बरी व्हायची. कोणी केलय ह्यांना डॉक्टर खरतर मी डॉक्टर झाले असते ना ……. नाआआ
आणि मग बस्स … हे चेटूक डोक्यात चढून बसायचं मला डॉक्टर व्हायचंय. मी घरी सांगूनही मोकळी व्हायचे कि मी डॉक्टर(च) होणार. आई आपली तेवढ्या पुरतं जाम खुशही व्हायची. बाबा एकच सुस्कारा सोडायचे (प्रत्येकवेळी) आणि दादा काहीतरी मिश्किल पुडी सोडून चिडवून पळून जायचा. पण मग हे इथेच थांबायचे नाही…

कधीतरी माझी आवडती वस्तू बिघडली कि मला इंजिनिअर व्हायचं असायचं, गणपती नवरात्रात मी मूर्तिकारच होणार असा जबरदस्त फील यायचा तसे त्या वयात मूर्तीतला मू ऱ्हस्व का दीर्घ हे सुद्धा किती समजायचं कोण जाणे? त्यावेळी हे फील-बिल समजणार सुद्धा वयही नव्हतं अन अक्कल तर नाहीच नाही; पण हे असं आतून का काय ते यायचं मात्र नक्की. कधीतरी बगीच्यांमध्ये फिरतांना रंगीत फुलं-पानं पाहून आपण गार्डनर व्हायचं अस पण मनात येउन गेलेलं आहे बर का … आणि या व्यतिरिक्तही अजून काय काय भारी भारी फिलिंग मला त्या वयात यायचं (म्हणजे मी कसली हुशार होते तेव्हा पासूनच नै ) ते सुद्धा सांगायचं होतंच पण आणखी किती कित्ती आणि कस कस तुम्हाला बोर करायचं म्हणून इथेच थांबते.

पण एक नक्की अजूनही वेळ गेलेली नाहीये अजूनही मला कित्ती कित्ती आणि काय काय व्हावसं वाटत असतं सारखं …. आणि वाटतंय तर वाटून घ्यायला तशी हरकतही काय आहे म्हणा …नै का? आयुष्याची गाडी चालतेय तोपर्यंत खाच खळगे, स्पीड ब्रेकर लागणारच उतार चढाव असणारच जाता येता आपलं असं छान छान काहीतरी वाटून घ्यावं काही-बाही. त्यातलं होतं ते करावं पूर्ण; राहिलच तर राहू द्यावं सोबतीला साठवून… शेजारी उशाशी

तर हल्ली मला ना गायिका, गिटार वादक, लेखिका, शिक्षिका, विचारवंत, बुद्धिवंत आणखी काय काय व्हावं असं फील येतंय.

हुश्श्श ! हेच सांगायला इतकं सगळं लिहिलं आज Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
मला तर अजुनही लायब्रेरीअन व्हावं .. काम नसेल तेव्हा पुस्तकं वाचावीत मन्सोक्त असच वाटतं
नाहीतर सरळ चिमणी व्हावं नि पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे भुर्र्कन उडुन जाव .. नकोच त्या कटकटी

किंवा लायब्ररीतली चिमणी?

मला अजुनही सल्लागार व्हावसं वाटतं, तसही फुकटचे सल्ले देत असतो, थोडेफार पैसे तरी मिळतील. Happy

मयी,मेंदू नावाच्या चिटूकल्या संस्थेला (हे मस्तंय)किती हा ताण !
एक असाच एसेमेस आठवला
''लहानपणी लोक विचारायचे की तुला मोठेपणी काय व्हायचंय ? ''
मग बरीच ..... टाकून
''पुन: लहान व्हायचंय !''

का ग तो इतका त्रास "मेन्दु" नावाच्या सन्स्थेला ?
आणि गम्मत माहितिये, अस सगळ वाटत असतानाच आपण कहितरी झालेलो असतो (वयाने मोठे ,चेहर्याने थोराड)
पण "ते वाटणे" सम्पत नाही.
ह्यालाच "शहाणे" होणे म्हणतात का?

ह्यालाच "शहाणे" होणे म्हणतात का? >>>>>>>> असं काही बाही वाटत राहिलं कि आपण एकतर शहाणे झालेलो असतो किंवा पुरते वेडे Proud

<<आणि गम्मत माहितिये, अस सगळ वाटत असतानाच आपण कहितरी झालेलो असतो (वयाने मोठे ,चेहर्याने थोराड)
पण "ते वाटणे" सम्पत नाही.>>
नेत्राला १०० मोदक विथ तुपाची धार.
वयाने मोठे ,चेहर्याने थोराड... त्यात वजन सुद्धा अ‍ॅड करा. Happy

सरकारी लाल फितीच्या कारभाराचा दणका बसल्यावर सगळ्या बोटचेप्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी मला स्टींग ऑपरेशन करणारा वाहीनीचा पत्रकार व्हायचं असतं..

पासपोर्ट साठी पोलीसाने लाच मागीतली की मला अँटीकरप्शन अधिकारी व्हायचं असतं....असंच बरंच काही.

असो. छान लिहीलंय...

Happy अविकुमार तुम्हाला वाटतंय तसं झालं असतं तर बरंच झालं असतं …पण असो ….

आणि अमिताभ म्हणलाय ना कधीतरी ऐसा लगता है तो लगने मे बुराई नही

अभिनेता / अभिनेत्री व्हावं. बरंच काही होता येतं मग निदान पडद्यावर तरी...

याबाबत देव आनंद यांचं उदाहरण फारच बोलकं आहे. त्यांनी पडद्यावर निभावलेल्या व्यक्तिरेखा फारच वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपुर्ण आहेत. निवडक यादी खालीलप्रमाणे:-

प्रशासकीय अधिकारी :- अफसर / साहिब बहादूर
जुगारी :- बाजी / गॅम्बलर
कुटुंब नियोजनाचा प्रचारकः- एक के बाद एक
टॅक्सी चालः- टॅक्सी ड्रायव्हर / जाने मन
मुनिमजी / खरा वारसदार :- मुनिमजी .
खिसेकापू:- पॉकेटमार
सीआयडी :- सीआयडी
क्रिकेटपटु:- लव मॅरेज
क्रिकेटपटु / क्रिकेट बोर्ड अध्यक्ष / सर्वोच्च पोलिस अधिकारी / सर्वोच्च सैन्य अधिकारी / वैमानिक :- अव्वल नंबर
चित्रपट तिकीटांचा काळा बाजार करणारा :- काला बाजार
चोर :- बंबई का बाबू
श्रीमंतीला कंटाळलेला श्रीमंताघरचा तरूणः- असली नकली / माया
रत्नपारखी :- ज्वेल थीफ
टूरिस्ट गाईड / नर्तकीचा व्यवस्थापक / साधू :- गाईड
वकील :- दुनिया / बात एक रात की
कॅप्टन / मेजर :- हम दोनो
आर्किटेक्ट :- तेरे घर के सामने
पियानो विक्रेता / शायर :- तीन देवियां
संस्थानी राजकुमार :- प्यार मोहोब्बत
सैनिक :- प्रेम पुजारी
गुप्त पोलिस अधिकारी :- जॉनी मेरा नाम / शरीफ बदमाश / छुपा रुस्तम
उघड पोलिस अधिकारी :- बुलेट
तुरुंग अधिकारी :- वॉरंट
तुरुंगातील कैदी :- जोशीला
तेरे मेरे सपने :- डॉक्टर
लेखक :- प्रेम शास्त्र
सर्कशीतला कसरतपटु :- कलाबाज
वैमानिक :- हरे राम हरे कृष्ण
विमान दुरुस्ती करणारा कारगिर / वाहन दुरुस्ती करणारा कारगिर :- लुटमार
फॅशन फोटोग्राफर :- हीरा पन्ना
स्थापत्य अभियंता :- यह गुलिस्तान हमारा
उद्योगपती / तोतया :- बनारसी बाबू
संन्यासी / दादा :- स्वामी दादा
संगीत संयोजक :- मनपसंद
उद्योगपती :- आनंद और आनंद
वृत्तपत्र संपादक :- सच्चे का बोलबाला
चित्रपट दिग्दर्शक :- सेन्सॉर / मै सोलह बरस की
किरिस्ताव धर्मोपदेशक / पाद्री :- गँगस्टर
रत्न पारखी / रत्न चोर :- रिटर्न ऑफ ज्वेल थीफ
महाविद्यालयीन प्राचार्य / लेखक :- हम नौजवान
सीबीआय तपास अधिकारी / राजकीय उमेदवार :- सौ करोड
सीबीआय तपास अधिकारी :- चार्जशीट
अनिवासी भारतीय उद्योगपती :- लव अ‍ॅट टाईम्स स्क्वेअर
अनिवासी भारतीय उद्योगपती / स्मृतिभ्रंश झालेला वृद्ध / खासदार / पंतप्रधान पदाचा संभाव्य उमेदवार (जो अंतिमतः पंतप्रधान व्हायचे नाकारतो) :- मिस्टर प्राईम मिनिस्टर

वरील यादी ही फारच लहान आहे. प्रत्यक्षात देव आनंद यांनी मोठ्या संख्येने वैविध्यपुर्ण भुमिका केल्या आहेत. प्रत्यक्षात देखील त्यांनी दिग्दर्शक / लेखक / निर्माता आणि अर्थातच अभिनेता म्हणून काम केले आहे. किशोर कुमार यांनी देखील वास्तवात दिग्दर्शक / लेखक / निर्माता / अभिनेता / गायक / गीतकार / संगीतकार म्हणून काम केले आहे. शारदा या गायिकेने देखील याच प्रकारे अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. लता मंगेशकर यांनी गायिका तसेच संगीतकार म्हणून काम केले आहे. त्या शिवाय उत्कृष्ट छायाचित्रकार असून क्रिकेटमधीलही उत्तम जाणकार आहेत.

राजकारणातील अतिशय पूजनीय असे व्यक्तिमत्त्व असलेले श्री. श्रीकांत जिचकार हे देखील आयएएस / आयपीएस अधिकारी असण्यासोबतच एकूण चौतीस पदव्यांचे धारक होते.