फोटोग्राफी स्पर्धा.. ऑक्टोबर.. "बिंब - प्रतिबिंब" निकाल

Submitted by उदयन.. on 1 October, 2013 - 07:27

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " ऑक्टोबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... " बिंब-प्रतिबिंब"

दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..

आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."बिंब प्रतिबिंब" हा विषय घेउन आलो आहे..

"बिंब-प्रतिबिंब" यात केवळ रिफ्लेक्शन्सच नाही तर त्याच्या सगळ्याच रुपांचा समावेश केला आहे.

प्रथम क्रमांक: - डीडी -
मुंबई-गोवा महामार्गावर काढलेलं प्रचि - खरंतर प्रतिबिंबच्या थीम मधे आरश्यातिल प्रतिबिंबाचा
हा फारच बेसिक वाटला असता. पण वर वर सहज-सोप्पा वाटणार्‍या या फोटो मधे फोटोग्राफरचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. योग्य अ‍ॅपेर्चर आणि आएसओ मुळे फक्त प्रतिबंब उठावदार होऊन बाकी फोटो पुसट झाला आहे (बोके). याच बरोबर अँगलही असा साधलाय की प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा योग्य ता़ळमेळ बसला आहे (रस्त्याच्या बॉर्डरची पांढरी लाईन बघा)

1st new.jpgद्वितीय क्रमांक - विभागुन

इंद्रधनुष्य - पाण्यातुन परावर्तित होणारा प्रकाश

2nd 2.jpg

इडली - गोलातिल प्रतिबंब

2nd.jpgतृतिय क्रमांक- विभागुन

नलिनी - गॉगल मधिल प्रतिबिंब

nalini 3rd.jpg

मामी - इंद्रवज्र

3rd.JPGउत्तेजनर्थः

प्रमेय - लहरीची लहर

uttejanarth 1 ne.jpg

आतिवास - पणजीत बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीची ही दर्शनी भिंत

3D 2Panajim 5 December 2011.jpg

आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह्ह्..केवळ अप्रतिम. पुन्हा पुन्हा पाहूनही मन भरत नाहिये.

या दोन फोटोंनी स्पर्धेची पातळी उच्च लेव्हलला नेऊन ठेवली आहे. सर्व स्पर्धकांसाठी आता या पातळीला पोहोचणे हेच खरे आव्हान असणार आहे.

रच्याकने, ऑक्टोंबर असं मराठीत म्हणतात का 'ऑक्टोबर' ला?

या दोन फोटोंनी स्पर्धेची पातळी उच्च लेव्हलला नेऊन ठेवली आहे. >>> +१
दोन्ही प्रचि खल्लास आहेत.

विषय आवडला. पण मायबोलीवर आधी कुठेतरी येऊन गेल्यासारखा वाटला. >>> मृ + १
२०१० च्या गणेशोत्सवात झब्बूकरता येऊन गेलाय. Sad
जरा हटके विषय द्या ना आयोजक. हा काही इतका चॅलेंजिंग नाही वाटत. ढीगानं फोटो येतील - झब्बूसारखेच. Happy

2010 साली झाला,,?
मी नव्हतो ओ,,,
असो,,,,,,,
त्यात फक्त पाण्यामधले प्रतिबिंब होते,,,,
इथे "प्रतिबिंब" चे सर्व प्रकारांचा समावेश केला,,,
शांग यांचा फोटो मायक्रो फोटोग्राफी मधे येतो,,,,
असे विविध रूपांचे फोटो अपेक्षित आहेत

सांकेतिक स्थळां ऐवजी संकेतस्थळ असा बदल करा प्लीज.

मागच्या धाग्याचे रिझल्ट कुठे आहेत? लिंकवणार का?

म्हणले तर विषय अवघडच आहे, कारण निव्वळ तळ्या/नदीकाठाची पाण्यातली प्रतिबिंबे इथे अपेक्षित नाहीत.
तसेच राखीव साठ्यात या विषयावरील फोटो असतीलच असे नाही, नव्याने काढावे लागतील.
छान विषय. उदाहरणाचा पहिला फोटो अप्रतिम.
दुसरा फोटो पान्ढरा चौकोन दिस्तोय, सबब "निषेध" Proud

दर महिन्याचा रिझल्ट ५ तारखेला जाहीर होतो...तसेच आपले परीक्षक त्यांच्या व्यस्त कामातुन वेळ काढुन निकाल जाहीर करण्याचे काम करत असल्याने... ते जर व्यस्त असतील तर निकाल जाहीर करण्यात उशीर सुध्दा होउ शकतो....

इथे............ अप्रतिम आणि अतिसुंदर प्रकाशचित्रे असतात...........

त्यामुळे ... प्रतिसाद देत असताना आपन देखील स्पर्धेत सहभागी व्हा.......

आपले प्रकाशचित्रे देखील अप्रतिम आहेत.........कृपया त्याची स्तुती करण्याची आम्हाला सुध्दा संधी द्यावी......:)

सगळे प्रचि मस्त वरचे 2 तर एकदम खत्रीच. असले भारी फोटो असताना मी यात भाग घेण्याची हिमत पण नाही करू शकत.

limbutimbu, पियु परी हे प्रत्यक्ष पाहताना मलाही चक्कर आली होती Happy
इमारतीच्या दर्शनी भिंतीवर काचांची त्रिमिती परिणाम साधणारी काहीतरी रचना होती ती - एवढंच कळलं मला तेव्हा!

पणजीतल्या लोकांना कदाचित ही इमारत माहिती असेल. (जनगणना कार्यालयाकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे - इतकं आठवतंय - नाव विसरले त्या भागाचं)

Pages