वेड

Submitted by रमा. on 1 October, 2013 - 03:49

आज तीच आशा वेडी
तेच स्वप्न वेडे..
तोच हट्ट वेडा आणि
तेच वेड वेडे..

वेड्या वळणावरी त्या
झाड जुने वेडे..
सडा फुलांचा वेडा
अन गंध तेच वेडे..

वेड हळ्वे, वेड कष्टी
जीवनाचे अर्थ वेडे..
वेड आता, अन निरंतर
वेड शत्रू, मित्र वेडे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users